
कोकणातल्या समुद्र किनारी आगरी जातीत जन्मलेला मी एक छोटा कार्यकर्ता आहे.माझे आडनाव जन्माने पिढीजात आगरी “पाटील” आहे.मी मराठा नाही.मी ब्राह्मण नाही.मी वैश्य नाही.मी शूद्र ओबीसी आगरी आहे.”पाटील” हे नाव महाराष्ट्रात जमीनदार,सरंजामी,सत्ताधारी क्षत्रिय मराठा उच्चवर्णीयसाठी प्रख्यात आहे.माझ्या आगरी जातीतून ब्राह्मण मराठा वैश्य गुजराती मारवाडी जमीनदारी खोती सावकारी विरोधात,लढताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी कोळी, भंडारी, कुणबी कराडी ओबीसी जात समूहातील,शूद्र जातीतून पुढे आलेले,आगरी नेते नारायण नागू पाटील. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ऍड.दत्ता पाटील.यांचे समकालिन दि.बा.पाटील,या समता समर्थक “पाटील” आडनावाच्या नेतृत्वानी,महाराष्ट्र आणि देशात समतेसाठी लढण्याचा मोठा इतिहास रचला आहे.”पाटील” हे आडनाव आज “क्षत्रिय मराठा” म्हणून विषमतेचे समर्थक दिसत असले?.तरीही,कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे मनुस्मृती विरोधक म्हणून, “आरक्षणाचे जनक” म्हणून साऱ्या जगात सुप्रसिद्ध आहेत.
जरांगे पाटील यांना,त्यांच्या कार्यकर्त्यांना,कोकणातील भूमिहीन कुळे असलेल्या कुणबी आगरी कोळी भंडारी जातींचा संघर्ष माहीत नसल्यामुळे?, त्यांना मराठा समाजातील राजर्षी शाहू महाराज यांचा आरक्षणाचा आणि छत्रपती शिवराय यांनी शूद्र रयतेचा, समुद्रावरील आगरी कोळी, भंडारी, कुणबी, मुस्लिम यांना सोबत घेऊन,समुद्रात उभ्या केलेल्या सागरी आरमाराची माहिती नाही.आंतरवळी सराटी परिसरातून येणाऱ्या “कडू गोड शिव्यांच्या मराठा भाषेतील” फोन कॉल्स मुळे मला हे अनुभवाने समजले आहे.त्यांना वाटते की राजाराम पाटील यांनी शूद्र ओबीसी हलके असून,मान सन्मानाचे प्रतीक,प्रतिष्ठादर्शक “पाटील” आडनाव मराठा समाजाकडून चोरले असावे?.अशा अर्थाच्या लाखो शिव्या माझ्या नावावर फेसबुकवर नोंद आहेत.मी मराठा भावांच्या अज्ञानाचे प्रतीक असलेल्या “शिव्या” त्यांना साभार परत करीत आहे.

देशातील स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी स्वतःच कमावलेल्या पैशातून, विषमतावादी लोकां विरोधात लढताना, महात्मा जोतिबा फुले,सावित्रीमाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड मोठे लिखाण कसे केले असेल?. आज मला एखादा लेख लिहिताना दमछाक होते.त्यामुळे मी अत्यंत आदराने,या महापुरुषांच्या प्रचंड प्रेमात पडलो आहे.कारण ते आज हयात नाहीत.तरीही त्यांच्या लिखित साहित्यामुळे समस्त शूद्रातीशुद्र ८५ टक्के भारताला गुलामीतून बाहेर येण्याचा सांविधानिक मार्ग दिसत आहे.मी सातत्याने फेसबुकवर लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. दैनिक महानायक मधून माझ्या लिखाणास मी जाहीर सुरुवात केली.समस्त आंबेडकरी भावांच्या मार्गदर्शन, सहकार्यामुळे माझ्यातील लपलेल्या लेखन कौशल्याची जाणीव मला झाली.विशेष सागर रामभाऊ तायडे या (सत्यशोधक) मित्रामुळे मला राज्यातील विविध वृतपत्रात नियमितपणे प्रसिद्धी मिळत आहे.दादर येथील चैत्यभूमीमुळे मला बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे साहित्य वाचायला मिळाले.त्या अगोदरची पस्तीस वर्षे वैदिक हिंदुत्वाच्या गुलामीच्या अंधारात मी जगलोय.त्यामुळं माझ्यासारखेच जगणाऱ्या,अज्ञानातून शिव्या देणाऱ्या,मराठा,ब्राह्मण,वैश्य लोढा यांचा द्वेष, राग मला नाही.
भारतात मनुस्मृती सारख्याच वेद उपनिषदे रामायण महाभारत या पुराण ग्रंथांनी आगरी कोळी ओबीसींसह स्त्रिया अतिशूद्र यांच्या गुलामीचे लेखन अनेक वेळा केले आहे.ते आम्ही समजून घेतले पाहिजे.वैदिक हिंदू धर्म आमची गुलामी सांगतो.आमच्या धार्मिक शोषणाचे समर्थन करतो.देशातील १५ टक्के ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णाच्या लोकांना जमीन जंगल पाणी उद्योग धर्म,राजसत्त,व्यापार यांचे सर्वाधिकार देतो.तर ओबीसी शूद्र यांनी त्यांची कायम सेवा करावी.ही गुलामी सांगतो.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या फायद्याचा हिंदू धर्म,चिकित्सा करून समजून घेऊन,सोडून द्यावा.हा भारतातील बुद्ध,चार्वाक,महावीर, महात्मा फुले सावित्री माई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आहे.कारण आमच्या शोषणाचा इतिहास हा फार भयंकर आहे.अनेक जणांना आपले जीवन यात संपवावे लागले आहे.

महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी मुंबई येथील मांडवी कोळीवाड्यातल्या आगरी कोळी भंडारी कराडी शूद्र ओबीसी बांधवांनी दिली.यानुसार पुढे ना.ना.पाटील, दत्ता पाटील, दि.बा.पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले यांना आगरी समाजाचे गुरु मानले.कोळी भंडारी नेते ही याच चळवळीत होते.पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आम्ही सर्व लोक कुळ कायद्याच्या आंदोलनात लढलो.कोकणातल्या कुणबी भंडारी आगरी कोळी कराडी यांना उच्चवर्णीय विषमता अनुभवानुसार माहित आहे.
आज महाराष्ट्राला कुणबी मराठा यांतील फरक समजत नाही.किंबहुना नव्या ओबीसी तरुणांना आमच्या ओबीसी पूर्वजांनवर,ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पुढारलेल्या उच्चवर्णीय जातीने, परक्या मुघल इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्यापेक्षा, भयानक गुलामी लादली होती.आमच्यावर अन्याय अत्याचार केले.हे माहित नसल्यामुळे ?.आमचे शत्रू आणि आगरी मित्रही अज्ञानामुळे आज माझ्यावर कडक टीका करीत आहेत.ओबीसी आरक्षण हे आम्हाला आगरी कोळी माळी धनगर भंडारी या ३७५ जातीना महाराष्ट्रात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधारी जातीनी नाकारलेले अधिकार,राजकीय नेतृत्व देते.यासाठी अगोदर या उच्चवर्णीय जाती विरोधात फुले,शाहू,आंबेडकर यांनी जीवघेणा संघर्ष करून सामाजिक न्यायाने ओबीसी आरक्षण मिळविले दिले आहे.अर्थात ब्राह्मण मराठा ही मंडळी आजही आम्हास राजकीय सत्ता देत नाहीत.हे सत्य मुख्यमंत्री पदावर बसलेले ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन मराठा क्षत्रिय उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांच्या राजकीय स्थितीवरून सिद्ध होते.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा लढा आम्ही कोकणात दि बा पाटील,ॲड जनार्दन पाटील,जनार्दन कोठेकर यांच्या नेतृत्वात मंडल आयोगापासून चालला आहे.यास मार्गदर्शन आपल्या आंबेडकरी बंधू भगिनींनी केले आहे.विरोध हा ब्राह्मण मराठा वैश्य लोकांचा आहे.या लढ्यात अनेक ओबीसी जातींच्या नेतृत्वाने आपली आहुती दिली आहे.दिवंगत प्राध्यापक हरी नरके हे मोठे नाव यात आहे.आज माननीय मंत्री छगनराव भुजबळ,विजय वडेट्टीवार, प्रा.श्रावण देवरे, ॲड.प्रदीप ढोबळे,प्रा. लक्ष्मण हाके,ॲड.मंगेश ससाणे, ॲड.मृणाल ढोले पाटील,ओबीसींच्या ३७५ जातीचे नेते आपापल्या ठिकाणी संघर्ष करतात.त्याचे मी मनापासून आभार मानतो.आणि अभिनंदन करतो.

ओबीसी चळवळीस मूर्ख बनविण्याचे काम सत्ताधारी जाती आणि त्यांचे चमचे मंडळी करीत असतात.यातील काही लोकांनी मराठा हे शूद्र आहेत.कुणबी आहेत.असा प्रचार करून,पुस्तके लिहून आजची स्थिती आणली आहे.त्यांचा मी निषेध करतो.ब्राह्मण मराठा वैश्य हे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांना राजकीय सत्ता देत नाहीत.गुलामी लादत आहेत.यात तिळमात्र शंका नाही.हे महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय स्थितीवरून दिसते आहे.येथे मुख्यमंत्री पदी कोणतीही स्त्री ओबीसी एससी एसटी बसू शकत नाही.तरीही महाराष्ट्र फुले,शाहू,आंबेडकरांचा कसा असू शकतो?.तो मनुवादी ब्राह्मण मराठा वैश्य यांचाच आहे.मराठे हे शूद्र नाहीत. हे चांगले माहीत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब म्हणून मोदी सरकारने १० टक्के EWS आरक्षण दिले.यात खऱ्या मागासवर्गीय गरीबांची घोर थट्टा झाली.
मराठ्यांना केवळ शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या हव्यात.राजकीय आरक्षण नको.म्हणून त्यांना १० टक्के sebc आरक्षण देण्यात आले.यात ओबीसींची पुन्हा फसवणूक करण्यात आली.क्षत्रिय ब्राह्मण वैश्य ही मंडळी शूर नव्हती.तर ८५ टक्के भारतीय स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांचे शोषण धर्माच्या आधारे करणारी क्रूर कपटी शोषक लोक होते.हे सत्य आम्ही अनुभवाने समजून घेणे गरजेचे होते.अर्थात असे सत्य स्पष्ट लिखाण हे माझ्यासह सर्वांचे जीवितास धोक्याचे आहे.हे मी जाणतो.याचा अनुभव फुले शाहू आंबेडकर यांनी घेतला आहे.
आज आरक्षणासाठी लढणे म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे होय.जग अनित्य आहे.जो जन्मला तो मरणार आहे.हे सत्य मी जाणले आहे.अगोदरची दोन आरक्षणे घेऊनही आम्हास ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांची फसवणूक करत आहेत.
ओबीसी आरक्षणाचा “दुराग्रह” हा ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाला संपविण्याचा डाव आहे.यास ब्राह्मण वैश्य या दोन्ही उच्चवर्णी लोकांचा पाठिंबा आहे.हे ओबीसी कुणबी दाखले,आरक्षण चोरी करणाऱ्या,मराठा लोकांच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारने दाखवून दिले आहे.ओबीसी हे मनातून समजतात.सांगू शकत नाहीत.बोलू शकत नाहीत.अवघड जागी दुखणे आहे ना?.
सरकार मराठा आंदोलक लोकांना जे सहकार्य करते.तसे सहकार्य माळी धनगर नेत्यांना म्हणजे ॲड.मंगेश ससाणे प्रा.हाके यांना का करीत नाही?.आम्ही आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी यापुढे आमच्या मुंबई परिसरात ओबीसी आरक्षणाचे लढाऊ आंदोलन उभे करू.छत्रपती शिवराय,महात्मा फुले राजर्षी शाहू,डॉ.आंबेडकर,भंडारी नेते सी के बोले,दि बा पाटील यांच्या संघर्षाचा आमचा अनुभव उभा महाराष्ट्रने पाहिला आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (महानगर पालिका, जिल्हा परिषद,नगरपरिषद) काही मराठा उमेदवारांनी ओबीसी (इतर मागास वर्गीय) आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी बोगस कुणबी प्रमाणपत्रे सादर केल्याचे प्रकार (जात पडताळणी समिती) आणि कोर्टाच्या कडक तपासणीमुळे उघड झाले आहेत.निवडणुका जिंकल्या नंतर जेव्हा त्यांच्या विरोधकांनी किंवा सजग नागरिकांनी त्यांच्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेत तक्रारी केल्या,तेव्हा अधिकृत तपासणीत ही बोगसगिरी समोर आली.आणि अनेक मराठा लोकप्रतिनिधीची पदे रद्द करण्यात आली आहेत.हे लक्षण म्हणजे मराठा (क्षत्रिय) आहेत.त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतून पुढे येणारा ओबीसी राजकीय स्पर्धक नकोय.तशी लोकसभा विधानसभा मराठा नेत्यांच्या हाती असताना ओबीसी राजकीय नेतृत्वाचे खून पाडणे?.असेच कृत्य पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदविले पाहिजे.
आपल्याकडे हुंड्यामुळे गर्भात मारल्या जाणाऱ्या “स्त्री भ्रूण हत्या” खून म्हणून मनुस्मृतीच्या नावे नोंदविल्या जात नाहीत.कारण गृहखाते ब्राह्मणांकडे आहे.ध्वनी प्रदूषणावर बोलणारे बापट मनुस्मृतीच्या हत्या का पाहत नाहीत.डोळे का मिटतात?.मराठा बांधव,ब्राह्मण बांधव,लोढा, अदानी यांनी मांजरीसारखे डोळे मिटून भारताची समता आरक्षण पिऊ नये.खाऊ नये.ओबीसी जागे आहेत.ओबीसी जागे होतील.आंदोलनयशस्वी करण्यासाठी तन मन धन घेऊन पुढे येतील.किमान आपली शूर निर्भीड प्रतिक्रिया देतील.ही अपेक्षा ठेवतो..
सर्व भारतीयांचा भाऊ.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण,जिल्हा – रायगड

