पाली-बुद्धिझम विभागात शिक्षक दिन उत्साहात.

बातमी शेअर करा.

विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना; ‘नेट’ उत्तीर्ण गणेश इंगळे यांचा सत्कार.

अमरावती, दि. ५ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. पाली आणि बुद्धिझम विभागात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमात विभागाच्या विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख आयु.प्रा.डॉ. तुलसीदास रामटेके होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एस. कुमार,प्रा.डोंगरे, प्रा.निर्गुळे,प्रा.पाटील, भिक्खू अमरावती सीलवंसलंकार तसेच विद्यार्थी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आयु.ॲड.सुधाकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आयु.अढाऊ यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण व पंचशील ग्रहणाने झाली. उपस्थित मान्यवरांचे वृक्ष, पुस्तक व पेन देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त एम.ए. भाग-१ व भाग-२ मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक-विद्यार्थी नाते, शिक्षणातील शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या.यावेळी पाली आणि बुद्धिझम एम.ए. भाग-२ चे विद्यार्थी आयु.गणेश इंगळे यांनी यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा अध्यक्षांच्या वतीने विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.तुलसीदास रामटेके यांनी शिक्षकाचे महत्त्व,शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील स्नेहपूर्ण संबंध आणि शिक्षण प्रक्रियेतील परस्पर संवाद यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने स्थापन झालेल्या विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,संघटनकौशल्य,अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी विकसित होण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अभ्यास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.


अभ्यास मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष :आयु.ॲड.सुधाकर पाटील,उपाध्यक्ष : आयु.विलास जामनेकर,सचिव : आयु. देविदास मेटांगे,सहसचिव : कांता राऊत (रामटेके),कोषाध्यक्ष : आयु. बाबुलाल सिरसाट,सहकोषाध्यक्ष : आयु. देवानंद पाटील,प्रसिद्धी समिती प्रमुख : आयु.अशोक भोरे, भिक्खू सीलवंसलंकार,सहप्रसिद्धी समिती प्रमुख : आयु. बी. टी. उरकुडे, तेजकला जाधव,सहल समिती प्रमुख : द्रौपदी मोहोड, सुनील वंजारी,सह सहल समिती प्रमुख : मंदा तायडे,सांस्कृतिक कार्यक्रम व नियोजन समिती प्रमुख : श्रद्धा गजभिये, शिवदास आढावू सह सांस्कृतिक कार्यक्रम व नियोजन समिती प्रमुख : रत्ना गंभीर अतिथी व्याख्यान समिती प्रमुख : वैशाली कोटांगळे, आयु. डॉ. विजया मुळे,सहअतिथी व्याख्यान समिती प्रमुख : सिद्धार्थ शेंद्रे अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक,बौद्धिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एस.कुमार यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यार्थी व विभागातील मान्यवरांची उपस्थिती होती.

भिक्खू सीलवंसलंकार,७५०७८९४२०३,अमरावती यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *