

संभाजी नगर – महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी निमित्ताने प्रौढ महिला विद्यालय,समर्थ नगर,संभाजीनगर येथील शाळेत महादेव डांबरे यांनी 15 ते 65 वयातील 8 वी ते 10 वी शिकलेल्या महिलांकरिता महापुरुषांच्या जीवनावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती. प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांकाला रुपये 161/- दुसऱ्या क्रमांकाला रू.131/- तर तृतीय क्रमांक ला रू.111/- असे रोख रकमेचे आज रोजी म्हणजे 3 सप्टेंबर 2026 ला एका छोट्याखाणी कार्यक्रमात वाटप करण्यात आले. स्पर्धेचा निकाल असा:वर्ग 10 वा :-प्रथम -यशोदा रामदल मुऱ्हाडे,द्वितीय – रंजना देवराव मस्के,तृतीय -भाग्यश्री सुरेश शेडगे,वर्ग 9वा:-प्रथम – माया रामभाऊ डोंगरे,द्वितीय- सोनाली शिवाजी चोपणे,तृतीय -पूजा नारायण धनले,वर्ग आठवा :-प्रथम – नंदा मारुती सावंत, द्वितीय -कविता नारायण खंदारे,तृतीय – कांता भीमराव निकम. यांना रोख रक्कम देण्यात आली.विशेष म्हणजे या शाळेत प्रौढ महिलांना ज्या निरीक्षण आहेत त्यांना थेट चौथीच्या वर्गात प्रवेश देण्यात येतो. वय मर्यादा कमीत कमी 15 ते 65 पर्यंत असावे लागते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमल रंधे होत्या,तर सौ कुसुम डांबरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या.निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक/ शिक्षिकेचे सहकार्य मिळाले.
महादेव डांबरे – 9665047153,संभाजीनगर


