
विशेष प्रतिनिधी बोरीवली – आज टाटा पावर मागठाणे संक्रमण शिबिरातील काही महिला पाण्याच्या समस्ये अभावी स्थानीक आमदार प्रकाश सुर्वे यांना पूर्व नियोजित वेळ घेवून भेटायला गेल्या होत्या.त्यावेळेस स्वतःच स्वतः ला स्वतः हून गोरगरिबांचे आमदार म्हणवणाऱ्या आमदार प्रकाश सुर्वे यांनी “तुम्ही मला मतदान केले नाही, तुमचा प्रश्न माझ्याकडे आणू नका” शेवटी त्यांना त्यांनीच दिलेल्या शब्दाची आठवण करु दिली असता, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी माजोरडी भाषा वापरून सर्व महिलांना परत पाठवून दिले.का कसला माज आमदार साहेब? तुम्हाला कोणी मतदान केले, कोणी नाही हे तुम्ही तपासून बघता का? ही सत्तेची भाषा की पैशाची भाषा?.तुमच्याकडे आलेल्या महिलांचा तुम्ही असाच सन्मान करता का?आमदार म्हणून तुम्ही जनतेचे सेवक आहात, निवडणुकी पूर्वी तुम्ही हा यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असा शब्द दिला होतात, म्हणून या महिला तुमच्याकडे आल्या होत्या.तुम्ही तुमचे कर्तव्य विसरला आहात, तुम्हाला काय करायचे ते करा, ही अरेरावी ची भाषा एक आमदार म्हणून शोभत नाही तुम्हाला! या घटनेचा जाहीर निषेध स्थानिक टाटा पावर मागठाणे संक्रमण शिबिरातील महिला व रहिवाशांनी केला आहे.
असे प्रमोद शिंदे- ८७९३२१३७३६ प्रवक्ता व सचिव,मुंबई प्रदेश संभाजी ब्रिगेड सांगितले.


