सम्राट अशोक यांची जयंती मैत्रेय बुद्ध विहार भांडुप येथे उत्स्फूर्त पणे साजरी.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी – बहुजन हिताय सेवा मंडळ मैत्रेय बुद्ध विहार भांडुप या ठिकाणी देवानंपिय चक्रवती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बहुजन हिताय महिला सेवा मंडळाच्या अध्यक्षा आयु.सुनीता ताई कासारे यांनी सूत्रसंचालन केले.आणि सम्राट अशोक यांच्या बद्दल माहिती सांगण्यात आली.तसेच त्यांनी आदरणीय ओव्हाळ सर यांनी आम्हाला धम्मलिपी चे महत्त्व काय आहे आणि ती का शिकली पाहिजे याचे महत्व सांगितले आणि त्यांनी मैत्रेय बुद्ध विहार या ठिकाणी धम्मालिपी चे वर्ग सुरू करण्यात आले त्यांच्या मुळे मी आज धम्मालिपी शिकू शकली.त्यांचे त्यांनी आभार मानले. त्याच प्रमाणे आदरणीय शिवराम वाघमारे यांनीही सम्राट अशोक यांच्याबद्दल माहित सांगितली. तसेच बहुजन हिताय सेवा मंडळाचे अध्यक्ष आयु.सुरेश माने यांनी ही सम्राट अशोक यांच्या बद्दल माहिती सांगितली सम्राट अशोक यांचा इतिहास सांगताना त्यांनी सांगितले की सगळ्यात पहिली धम्मक्रांती ही तथागत गौतम बुद्ध यांनी केली त्यांच्या मुळे बौद्ध धर्म अस्तिवात आला त्यांनी ही खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करून अखंड जम्बुदीपात पसरविला. त्यानंतर दुसरी धम्मक्रांती ही कलिंग च्या युद्धानंतर झाली सम्राट अशोकाची कलिंग च्या युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी ह्या जगात 84 हजार स्तूप तसेच विहार कातळात कोरले गेले.आणि भिख्खू संघास रहाण्याची सोय तसेच त्यांना ध्यानसाधने साठी शून्यगृहाची निर्मिती केली. सम्राट अशोक यांनी ही खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. जर का पुढील पिढिला सम्राट अशोका चा इतिहास माहिती करण्यासाठी अनेक उपासक यांनी अल्प परिचित लेणी वर गेले पाहिजे पाली चा अभ्यास केला पाहिजे अरकॉलॉयजी च्या कोर्स साठी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे तरच आपल्या ह्या लेण्या शिलालेख किंवा कातळ शिल्प यांचा ठोस अभ्यास कळेल..तसेच अशाच लेण्यावर एकजूट लेणी तसेच मैत्रेय बुद्ध विहार दौरे करत असतात आणि अभ्यास दौरा करत असते त्यामध्ये तुम्ही ही सामील होऊ शकता…

आणि तिसरी महाक्रांती ही परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.त्यांनी जर आपल्याला बौद्ध धम्माची ची दिक्षा देऊन त्यांनी आपल्यावर अनंत उपकार केले आणि बौद्ध धम्म काय आहे हे आम्हाल समजले.आणि त्यांच्या मुळेच आम्ही लेणी पर्यंत पोहचू शकलो.एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह (महाराष्ट्र राज्य) याचे अध्यक्ष आदरणीय दादुस डोळस सर यांच्या आभार मानले त्यांच्या मुळे आम्ही लेणी पर्यंत पोहचू शकलो आणि आदरणीय सयाजीराव कांबळे तसेच आदरणीय ओव्हाळ सर यांच्या मुळे आम्ही धम्मालिपी शिकू शकलो वाचू शकलो.त्याचे ही मनापासून आभार मानण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी मंडळाचे सेक्रेटरी आयु. मिलिद दाभाडे मंडळाचे उपाध्यक्ष आयु.सचिन रांजणे,मंडळाचे उप सेक्रेटरी आयु.दिलीप भगत तसेच सुमित कासारे. शिवराम वाघमारे महिला अध्यक्ष सुनीता ताई कासारे आणि आयु. सीताराम शिंदे तसेच मंडळाचे अध्यक्ष सुरेश माने उपस्थित होते 

आयु.सुरेश माने-अध्यक्ष बहुजन हिताय सेवा मंडळ मैत्रेय बुद्ध विहार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *