
विशेष प्रतिनिधी – शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण हे विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती ती सध्या मोडून काढल्या जात आहे.ज्या समाजात महिलांना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तो भारतीय संविधानाने मिळवून दिला.म्हणूनच आज पुरुषा बरोबर महिला आणि तृतीय पंथी सुद्धा शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होत आहेत.भारतीय समाजासाठी गौरवशाली बातमी ‘पृथ्वी’ नावाच्या किन्नर महिलेने भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून स्थान मिळवले असल्याची बाब अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी मानली गेली पाहिजेत होती. समाजातील अनेक अडथळे,पूर्वग्रह व भेदभाव यांना सामोरे जात,कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अशा उच्च पदावर पोहोचणे, ही तिच्या जिद्दीची व कर्तृत्वाची साक्ष आहे.
कायद्याच्या दृष्टीने पाहता,भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकास समानतेचा हक्क,शिक्षणाचा हक्क व रोजगाराच्या संधींचा समान अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. लिंग ओळखीच्या आधारावर भेदभाव करणे हे कायद्याने निषिद्ध असून, तृतीयपंथीय व्यक्तींनाही सर्व क्षेत्रांत समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे, ‘पृथ्वी’ हिची IPS पदावर नियुक्ती ही समानता व समावेशकतेच्या तत्त्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दर्शवणारी घटना आहे. भारतीय संविधान मानणाऱ्या प्रचार प्रसार माध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली पाहिजे होती. पण तिला मनुवादी मानसिकता असणाऱ्या पत्रकार संपादकांनी दुर्लक्षत केले आहे.म्हणून आपण तिला प्रसिद्धी दिली पाहिजे.
तसेच,ही उपलब्धी केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून,संपूर्ण किन्नर समाजासाठी प्रेरणादायी ठरते.तिच्या या यशामुळे समाजातील इतर तृतीयपंथीय व्यक्तींना शिक्षण,स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, ज्यामुळे त्यांचे सामाजिक व आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत होईल.ही घटना दर्शवते की, प्रतिकूल परिस्थिती असूनही योग्य संधी,शिक्षण व परिश्रम यांच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती उच्च शिखर गाठू शकते.समाजाने अशा यशस्वी व्यक्तींना प्रोत्साहन देऊन समतेच्या तत्त्वांना अधिक बळकटी देणे आवश्यक आहे.त्यामुळे,’पृथ्वी’ हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येतात. #Inspiration #Equality #TransgenderEmpowerment #IPS #SuccessStory
संकलन :- सागर रामभाऊ तायडे यांस कडून
