
विशेष प्रतिनिधी मुंबई – जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरुवर्य पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर १९५६ रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महामानवास महावंदना हा कार्यक्रम दिनांक ७ डिसेंबर रोजी जयभीम नगर बुद्ध विहार कोलगेट ऑफिस हिरानंदानी गार्डन समोर पवई मुंबई येथे सन २००१ पासून अखंड २६ वर्षापासून सातत्याने आयोजित केला जात आहे.ही दोन दशकांहून अधिक काळ टिकलेली सामाजिक,धार्मिक, मानवतावादी परंपरा आहे. कार्यक्रमाचा उद्देश परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या विचाराचा प्रसार करणे, यांच्या संदेश दृढ करणे हा आहे.दरवर्षी सहा डिसेंबर रोजी भारतभरातून तसेच परदेशातून लाखो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना आदरणीय अर्पण करण्यासाठी येतात. चैत्यभूमी परिसरातील अतिशय मोठ्या गर्दीमुळे हजारो अनुयायी आणि बौद्ध भिक्खू संघ जय भीम नगर बुद्ध विहार येथे चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान वास्तव्यास राहतात.
वर्षानुवर्ष सुरू असलेला सदर कार्यक्रम हा या वर्षातील भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे. सोमवार दिनांक ७ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत महामानवास मानवंदनापार पडणार आहे. त्या दिवशी १५००० पेक्षा अधिक अनुयायी ८०० बौद्ध धम्मगुरु हे सर्व कार्यक्रमाला भेटी देणार आहेत.दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात अनुयायी व धम्म गुरु मिळून परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना मानवंदना, श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतात.व ८०० बौद्ध धर्मगुरूंना बाबासाहेबांच्या पुण्य पारमिता बुद्धिगत करण्याकरिता चिवरदान,आर्थिकदान, साहित्य दान असे महासंघ दान केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाच्या कालावधीत भिक्खू संघ स्थानिक नागरिक यांच्या स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नातून राहण्याची व्यवस्था,भोजन,पाणी पाण्याची व्यवस्था,स्वच्छतागृहे,आरोग्य सहाय्य तसेच सभा स्वागत मंडप इत्यादी सर्व सुविधा पुण्यवान धम्म उपासक उपासिका यांच्या दानातून केल्या जात असतात.

यावेळी प्रमुख उपस्थिती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब,जगातील सर्वात मोठे शिक्षण क्षेत्रातील यू ट्यूब चॅनल चलविणारे तसेच हजारो गरीब विद्यार्थ्यांनामोफत शिक्षण देऊन उच्च अधिकारी पदा पर्यन्त पोचविणारे व लाखों लोकांना मोफत आरोग्य सेवा,शिक्षण सेवा उपलब्ध करून देणारे शिक्षक अनाथांचे नाथ असे लाडके माननीय खान सर (पटना बिहार) ,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयघोष वाक्य “जयभिम” हे केवळ एका समाजाचे नसून या भारत देशातील आणि जगातील प्रत्येक पिढीतांना न्याय देणारा त्यांच्या कमजोर आवाजाला मजबूतपणे बळ देऊन आपले अधिकार मिळवून देणारा जयभिम हा नारा आहे. आपल्या संविधानिक जन आंदोलनातून जगासमोर व लोकांसमोर मांडणारे एक सक्षम नेतृत्व माननीय अभिजीत दिपके,हे विशेष मान्यवरांचे सामाजिक प्रबोधन होणार आहे. विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गीतांमधून मानवंदना आणि आपल्या बुद्ध भिम गीतांतून समाजप्रबोधन करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे,विशाल चव्हाण यांचा दणदणीत गितगायन होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध धम्मात असलेले महासंघदान या कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होण्याची संधीजागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरुवर्य पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध होत आहे. याचे फार मोठे पुण्य आहे.त्या पुण्यधर्माने आपले मंगल होवो.आपल्या प्रती मंगल मैत्री सदिच्छा सध्दभावना.ही त्यांची मंगल कामना आहे.

जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरुवर्य पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या कुशल मार्गदर्शन व नेतृत्वाखाली बौद्धगया बिहार येथे 500 उपासका उपासीकांची उत्कृष्ट राहण्याची व्यवस्था केली आहे.तसेच औरंगाबाद बुद्ध लेणी येथे बौद्ध अनुयायासाठी 110 एकर जमिनीवर बौद्ध स्थळ उभारणी होत आहे. हिरानंदानी सारख्या परिसरात भव्य बुद्ध विहाराचे नंदनवन करण्याचा संकल्प त्यांनी केला. मुंबईत कोणत्याही बुद्ध विहारात असा भव्य दिव्य लक्षवेधी प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होत नाही.पण मुंबईतील सर्वात उच्च इमारती व लक्षवेधी उच्च भू लोकांच्या हाय सोसायटीत महामानवास मानवंदना जय भीम नगर बुद्धभूमी वेल्फर असोशियन आयोजित जय भीम नगर बुद्ध विहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई ४०००७६येथे सोमवार दिनांक ७ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पासून रात्री ११ वाजेपर्यंत पूजनीय धम्म गुरुवर्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न होणार आहे. तरी सन्माननीय दानशूर धम्म उपासक धम्म उपासीका यांनी या कार्यक्रमाला सढळ हस्ते धम्म दान करून पुण्य संपादन करावे असे भदंत शिलबोधी थेरो ८३६९६५६७८३ यांनी जाहीर आवाहन केले आहे.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून

