जंतर-मंतरवर : महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हजारो बौद्ध अनुयायांचे विराट आंदोलन.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली -१२ फेब्रुवारी २०२६ बिहारमधील बुद्धगया येथील जागतिक वारसा असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाच्या स्वाधीन करावे, या मागणीसाठी आज १२ फेब्रुवारी २०२६ रोजी राजधानीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर जनसागराचा महासागर लोटला होता. देशभरातून आलेल्या हजारो भिक्खू संघ आणि उपासक-उपासिकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने ‘महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना’चा एल्गार पुकारला.

धम्ममय वातावरणात उमटला न्यायाचा स्वर बुधवारी सकाळपासूनच जंतर-मंतर परिसर ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या जयघोषाने निनादला होता. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शेकडो भिक्खूंच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला एक वेगळे आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले होते. भगव्या आणि पांढऱ्या वस्त्रांमधील जनसमुदायामुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता.या आंदोलनाचे नेतृत्व भंते विनयाचार्य, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिक्खू शाक्यपुत्र राहुल,पूज्य भदंत पय्यानंद थेरो तसेच प्रमुख उपस्थिती भिक्खू संघ तसेच पूज्यनीय भिक्खू बुद्धप्रिय,पूज्यनीय भिक्खू अमरावती सीलवंसलंकार आणि श्रामनेर संघ सोबत प्रमुख भंते धम्मानंद यांनी केले.

प्रमुख मागणी: महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीमध्ये केवळ बौद्ध धर्मीयांचा समावेश असावा आणि त्याचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे.

• या आंदोलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि अनेक खासदारांनी भेट देऊन आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला.शिस्त आणि संविधानाचा आदर्श हजारो जनसमुदाय असूनही आंदोलना दरम्यान कमालीची शिस्त पाहायला मिळाली. संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडत असताना आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता शांततेत पार पडलेल्या या आंदोलनाने राजधानीचे लक्ष वेधून घेतले.

“हे आंदोलन केवळ हक्कासाठी नसून धम्म आणि न्यायाच्या रक्षणासाठी आहे. बौद्ध समाजात यामुळे नवी चेतना निर्माण झाली असून, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.”-  भिक्खू शाक्यपुत्र राहुल. 

पुढील दिशा: १ नोव्हेंबर २०२६ ची घोषणा आंदोलनाच्या यशस्वी सांगतेनंतर आयोजकांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे. महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठीचा हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून, पुढील भव्य आंदोलन १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. या घोषणेमुळे बौद्ध अनुयायांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी काळात हे आंदोलन देशव्यापी होण्याची चिन्हे आहेत.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भिक्खू शाक्यपुत्र राहुल,यांस कडून


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *