दीक्षाभूमी ते चैत्यभूमी धम्म ध्वज जनसंवाद यात्रा मुंबई कडे येत आहे.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बी टी ऍक्ट 1949 रद्द करण्यासाठी भंते विनाचार्य यांची जनसंवाद यात्रा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईकडे येत आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविल्या जात आहे, ऐतिहासिक असा सभेचे आयोजन जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झालेला आहे.दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या धम्म ध्वज जन संवाद यात्रा मुंबईकडे येत आहे.या यात्रेमध्ये पूज्यनीय भिक्षु संघ,उपासक,उपासिका संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.बिहार राज्य सरकारने षडयंत्र करून भंते विनाचार्य यांना जवळपास 68 दिवस कारागृहात ठेवले होते.कारागृहातून बाहेर येताच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा अधिक तीव्र गतीने करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांशी संवाद करण्यासाठी दिनांक 28 ऑगस्ट नाशिक, 29 ऑगस्ट कल्याण,30 ऑगस्ट डोंबिवली,31 ऑगस्ट ठाणे,1 सप्टेंबर चेंबूर घाटकोपर आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूला अभिवादन करण्यासाठी अभिवादन समारोह चैत्यभूमी दादर या ठिकाणी होणार आहे.
आपल्याला सर्व जागरूक धम्म बांधवांना नम्र निवेदन आहे की आपण सर्वानी या धम्म ध्वज जन संवाद यात्रे च्या समारोहात चैत्यभूमी दादर मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वज जन संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करा.आपसातील सर्व मतभेद विसरून एकत्र येऊ यावे. असे धम्म प्रचारक आयु.सागर तायडे (पत्रकार),आयु.संतोष परघरमोल यांनी जाहीर आवाहन केले आहे. अधिक माहिती करिता संतोष परघरमोल-९२२२१०८५२४०,यांच्याशी संपर्क करावा.
संतोष परघरमोल-९२२२१०८५२४० यांस कडून मुंबई.
