
विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत त्यामुळे त्याना देशाच्या भविष्याची चिंता आहे. अलीकडे झालेल्या नीट पेपर फुटी मुळे,विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली असून आतापर्यंत जवळपास वीस विद्यार्थी यांनी नैराश्य आल्यामुळे आत्महत्या केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी हा पेटून उठला आणि ज्यांनी स्वार्था पोटी म्हणजे पैशासाठी नीट पेपर फोडून, चोरून विकली त्यामुळे मेहनत करणारा विद्यार्थी तो गरीब असेल या श्रीमंत असेल त्याला स्वाभाविक पणे वाईट वाटेल आणि तो निराश होईल. देशात 80 कोटी लोकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून प्रति व्यक्ती पाच किलो अनाज सरकार मोफत देत आहे. याचा अर्थ 80 करोड लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे असे सरकार सांगते. यामध्ये सर्व धर्मीय बांधव आहेत. पण जास्तीत जास्त हिंदू आहेत आणि ते गरीब आहेत. राम मंदिर बांधण्यात त्याचाच पुढाकार होता. त्या अयोध्येतील राम मंदिर मधून देखील तेथील पुजारी आणि कर्मचारी यांनी गहने आणि पैशाची चोरी केली.ज्यांच्यावर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी दिली तेच जर चोरी करीत असेल तर मग लोकांनी कोणावर विस्वास ठेवायचा? हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो.
मन की बात? म्हणून आमचे सन्मान निय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे भारत विश्वगुरू म्हणून उदयास येणार यात शंका बाळगू नका तुम्ही आम्हाला एकदा चान्स दया, लोकांनी निवडून दिले. पण गरिबी दूर झाली नाही. 80 करोड जनता आजही दारिद्र्यात जीवन जगत आहे. बेरोजगारी वाढत आहे. रामाचे मंदिर झाले पण बेरोजगारी दूर झाली नाही. तेथील पुजारी अमीर होत असल्याचे दिसायला लागले. देवाच्या नावावर पुजारी श्रीमंत होत आहे. तो राम मंदिरात जमा होणारा पैसा हा भारतातील ज्या लोकांची श्रद्धा रामावर म्हणजे देवावर आहे, त्यानी सोने आणि पैसा दान दिला आहे.त्याचीही फसवणूक होत आहे. म्हणजे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे शासन, प्रशासन यांचे लक्ष नसते का? की ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात असा प्रश्न स्वाभाविकपने देवाला मानणाऱ्या भक्ताच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे भक्त चिंतेत असल्याचे दिसते त्यामुळे मग पेपर फुटी प्रकरण असो की राम मंदिर पैसा,सोने चोरी प्रकरण असो,ज्यांच्यावर जबाबदारी ज्यांनी दिली त्याला लोक विचारतील यात शासनाचे कुठेही दुमत असायला नको? कारण निवडून गेलेल्या प्रत्येक प्रतिनिधीनी लोकांच्या हितासाठी काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यामुळे त्याला जबाबदारी नाकारता येत नाही.त्यामुळे नीट पेपर लीक संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी अभिजित दिपके आणि विद्यार्थी जंतर मंतर वर चाललेल्या सिजिओ पार्टी ने विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी चालविलेल्या आंदोलन दरम्यान होत आहे.
अभिजित दिपके काक्रोच जनता पार्टी प्रमुख यांनी काल दिनांक 18 जुलै पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. वीस जुलै रोजी मोर्चा संसद भवनावर निघेल त्याचे नेतृत्व सोनम वांगचूक करणार आहे. जर तसे झाल नाही तर सोनम वांगचूक च्या पत्नी गीतांजली या मोर्चाचे नेतृत्व करेल असे तिने जाहीर केले आहे. त्यामुळे पेपर फुटी प्रकरण या प्रश्नाकडे शासन किती काळजी पूर्वक लक्ष देते यावर जनतेचे लक्ष लागले आहे. संपूर्ण देशातून या पेपर फुटी प्रकरणात आंदोलन होऊ लागले आहे. आणि ते भावी नागरिकांच्या हिताचे असून चांगला समाज निर्माण व्हावा या हेतूने आहे असे लोकांना वाटते. शासनाने जे दोषी असतील मग ते कोणीही असो योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी यासाठी विद्यार्थी चे आंदोलन आहे असे दिसते.आता काल पासून अभिजित दिपके आमरण उपोषण जंतर मंतर वर करीत आहे. हजारो विद्यार्थी त्याच्या सोबत आहे. त्यामुळे शासनाने देशाचे नागरिक आणि विद्यार्थी यांचा प्रश्न तातडीने सोडवावा असे देश बांधवाना वाटू लागले आहे. प्रश्न सोडविणे हे शासनाची जबाबदारी आहे आणि कर्तव्य देखील आहे.

“सोनम वांगचूक” हे एक वैज्ञानिक असून त्याला सामाजिक जाण आणि भान आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले असून, देशहीत त्याचा हेतू आहे.नीट सारखे पेपर लीक झालीत तर भविष्यात चांगले वैज्ञानिक निर्माण होणार नाही, जिकडे तिकडे कल्लोळ माजेल. खून खराबे होतील, चांगली मूल, मुली निराश होतील, आत्महत्या करतील. देशाहिताची चिंता सोनम वांगचूक याला असल्यामुळे त्यानी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदविला असे त्याच्या कार्यावरून दिसते. मी देशाहितासाठी बलिदान दिले, चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी माझा देह कामी येईल असे त्याला वाटले असावे त्यामुळे त्यानी विद्यार्थ्यांनी चालविलेल्या आंदोलनात उडी घेतली आणि त्यानी न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले 28 जून 2026 पासून चाललेले आंदोलन आज पर्यंत तोडगा निघाला नाही. मागील अठरा दिवसा पासून सोनम वांगचूक हे आमरण उपोषण करीत आहेत पण शासनानी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्याची प्रकृती खालवत जात असल्यामुळे, कोणीतरी कोर्टात गेले असल्याने कोर्टाने त्याची जीवाची काळजी घ्या अशा सूचना वजा आदेश शासनाला दिल्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याना दिल्ली येथील सरकारी रुग्णालयात हलविले आहे.त्याची प्रकृती चिंता जनक आहे. त्यानी अजूनही औषध घेतले नसल्याचे समजते त्याना स्वतःपेक्षा देशाची चिंता जास्त आहे. त्याना वाटते असे नीट सारखे पेपर लीक होत राहिले तर भविष्यात भारतात चांगले डॉक्टर,इंजिनिअर,वैज्ञानिक,कलेक्टर, न्यायाधीश,चांगले राजकीय नेता,म्हणजे प्रधानमंत्री,संरक्षण मंत्री,राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल निर्माण होणार नाही आणि भ्रष्टाचार वाढेल ही भीती वजा शंका सोनम वांगचूक ला येत असावी आणि त्याचा सामाजिक पिंड असल्यामुळे त्यानी विद्यार्थ्यांचा हिताचा प्रश्न उचलून धरला असावा असे दिसते. 20 जुलै ला संसद भवनावर मोर्चा काढण्याचे येलान केल्यामुळे त्याना बळजबरीने दिनांक 18/07/2026 ला रुग्णालयात नेले असावे असे आंदोलन कर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. भारतीय संविधानामध्ये कोणताही व्यक्ती अन्न पाण्यावाचून मरणार नाही यांची काळजी घेण्याची जबाबदारी शासनाची असते. न्यायालयाने सरकारवर जबाबदारी निश्चित केल्यामुळे त्याना दवाखान्यात नेले. आपला प्रश्न जनहितासाठी असल्यामुळे विद्यार्थी आणि अनेक पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या आंदोलनाला सहकार्य करण्याचे निश्चित पणे आश्वासन दिले आहे.त्यात ऍड.बाळासाहेब आंबेडकर वंचीत पक्ष प्रमुख,चंद्रशेखर आजाद,संसद सदस्य,केजरीवाल आप पक्ष प्रमुख,आणि राहुल गांधी काँग्रेस प्रमुख यांनी आंदोलना ला पाठिंबा दिला आहे. या सर्व कारणाने आता हा प्रश्न सर्व सामान्यांचा झाला असे असे लोक समजू लागले. तसे पेपर फुटी म्हणजे देशाला पोखरून टाकणारा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासन आणि शासन यांनी या विद्यार्थ्यां च्या प्रश्नाकडे गंभीरता पूर्वक लक्ष दिले पाहिजे.
जयभारत, जय संविधान.
अविनाश टिपले- 9970917389,चंद्रपूर.

