कामगाराच्या हितासाठी जेलभरो आंदोलन करणार- कामगार नेते नितीन भाऊ दवंडे

हिंगोली- येथे दिनांक 15 जुलै रोजी सरकारी कामगार अधिकारी कार्यालया समोर कामगार विभागाच्या शासन निर्णय जाळून त्याची होळी करून निषेध करण्यात आला.जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची सरकारी कामगार अधिकारी यांना निवेदन देऊन शासन निर्णयाचे कामगारांना जे शैक्षणिक योजना आहेत त्या कायद्याच्या विरोधात असून व कामगारांच्या हितासाठी नसून हे ठेकेदारांच्या हितासाठी आहे असे निदर्शनास आणून देण्यात आली
दिलेल्या निवेदनाच्या प्रमुख मागण्या
1. योजना पूर्ववत सुरू करा: इयत्ता 1 ली ते 9 वी, 11 वी आणि सर्व मान्यता प्राप्त डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमासाठी मिळणारे शैक्षणिक लाभ योजना कोणतीही कपात न करता तातडीने सुरू करण्यात यावी.
2. अंकित अर्ज निकाली काढा: ज्या पाल्यांनी मागील शैक्षणिक वर्षात अर्ज केले आहेत आणि जे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना तात्काळ लाभ वर्ग करण्यात यावा.
3. मंजुरीची प्रक्रिया सुलभ करा: शैक्षणिक लाभासाठीचे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ करावी, जेणेकरून अशिक्षित कामगारांना त्याचा त्रास होणार नाही.
अशा प्रमुख मागण्यांचा सकारात्मक विचार करून जर शासनाने व मंडळांने ही शैक्षणिक मदत योजना तात्काळ सुरू केली नाही, तर “जनप्रहार कामगार संघटना” संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन, धरणे प्रदर्शन आणि कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा उभारण्यास मागे पुढे पाहणार नाही. असा नितीन भाऊ दवंडे संस्थापक अध्यक्ष जनप्रहार कामगार संघटन यांनी इशारा दिला.अशी यापुढील आंदोलनाची रूपरेषा असेल,असे त्यांनी सांगितले.

सरकारी कामगार अधिकारी तथा उप जिल्हा कार्यकारी (प्रभारी) हिंगोली यांना नितीन भाऊ दवंडे संस्थापक अध्यक्ष जनप्रहार कामगार संघटन यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन दिले.उप जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी हिंगोळी यांनी ताबडतोब निवेदनाची दखल घेऊन मुंबई कार्यालयाला पत्र पाठविले. यावेळी जनप्रहार कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ दवंडे, सिद्धार्थ दवंडे, गजानन गायकवाड, पवन ढवळे, पूजा खंदारे, अनिल भालेराव, राजेश पारधे, निखिल आठवले, गजानन इक्कर, संजय हाके इत्यादी पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होता.

नितीन भाऊ दवंडे ९८३४३५३९८८,संस्थापक अध्यक्ष जनप्रहार कामगार संघटन हिंगोली यांस कडून
