महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन,पुणे परिमंडळ यांचा शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे मानवंदना व सेवा उपक्रम.

बातमी शेअर करा.


विशेष प्रतिनिधी- भीमा कोरेगांव :- शौर्य,स्वाभिमान व संघर्षाचे प्रतीक असलेल्या १ जानेवारी शौर्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन (संलग्न : स्वतंत्र मजूर युनियन),शाखा पुणे परिमंडळ यांच्या वतीने भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या अनुयायांसाठी खिचडी,पाणी व पुस्तक वाटपाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ४०० केव्ही लोणीकंद ग्रहण केंद्र,नगर रोड,गेटसमोर आयोजित करण्यात आला होता.
   कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पडळकर साहेब (अधीक्षक अभियंता,महावितरण,पुणे) यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.संजय घोडके साहेब (केंद्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन) हे उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.युवराज जरग साहेब (अधीक्षक अभियंता, महावितरण,पुणे परिमंडळ) यांनी उपस्थिती लावली. तसेच मा.भोळे साहेब (अधीक्षक अभियंता,महावितरण पुणे),मा.गणेश मुरकुटे साहेब (केंद्रीय उपाध्यक्ष),मा.मनोज सूर्यवंशी साहेब (केंद्रीय उपाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.याशिवाय किशोर आहिवळे,संजय रामटेके,अबरवाडीकर (कार्यकारी अभियंता,४०० केव्ही लोणीकंद) हे मान्यवर उपस्थित होते.

या ऐतिहासिक व प्रेरणादायी शौर्यदिनाच्या निमित्ताने संघटनेची एकजूट,सामाजिक बांधिलकी व सेवा भाव अधोरेखित होत असल्याचे मत मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद रोडे, गौतम राऊत,विजय पवार,पुनाजी मोहंडुळे,प्रकाश सूर्यवंशी,युवराज कांबळे,वैशाली शिरसाठ,सुजाता गडलिंग,छाया पखाले,सुवर्णा परहर,शीतल लिहितकर,पंडित दांडगे,विजय सोपेवाड, राजेश खरे,सागर लोंढे,शिवलिंग बोरे,कल्याण जाधव,रवींद्र गायकवाड,जगन्नाथ गायकवाड,सचिन मखर,राहुल इंगळे,दीक्षा खोडके,निलेश भालेरासतीश सरवदे, गजानन गवळी,सिद्धार्थ थोरात,गोपाल बोलचटवार, प्रशांत गाडे,मनोज शिरसाठ,अंकुश गडलिंग,आदिनाथ पोरे तसेच इतर अनेक सभासद व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संघटनेच्या वतीने सर्व सहभागी सभासद,पदाधिकारी व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

गणेश मुरकुटे ८८८८८९७१९७ यांस कडून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *