
विशेष प्रतिनिधी मुंबई ७ जानेवारी,२०२६ ऐतिहासिक श्रीवर्धन तालुक्यातील चिखलप गावचे सुपुत्र, समाजसेवक,धम्म प्रचारक धम्मपुत्र तथा संजयकुमार संजयकुमार खैरे यांना युवा बौद्ध धम्म परिषद (महाराष्ट्र व कर्नाटक राज्य) या संस्थेच्या विद्यमाने,सन २०२६ सालचा “भंते नागरत्नजी” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.अविरतपणे करीत असलेल्या ‘धम्मकार्य’ क्षेत्रातील उल्लेखनीय,भरीव योगदानाबद्दल सदर संस्थेने दखल घेऊन, दिनांक १८ जानेवारी, २०२६ रोजी हुपरी,तालुका – हातकणंगले,जिल्हा- कोल्हापूर येथे संपन्न होत असलेल्या १० व्या बौध्द धम्म परिषदेत मान्यवरांच्या हस्ते खैरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शूर्पारक तथा नालासोपारा नगरीमध्ये उदरनिर्वाहाच्या निमित्ताने सुमारे पंचवीस वर्षे वास्तव्यास असलेले खैरे दांपत्य अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असून बौद्धधम्माचा प्रचार/प्रसार करीत आहेत.असे असले तरी उगमस्थान असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात तेवढ्याच तत्परतेने सामाजिक कार्य चालू आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कार्यरत असलेल्या नामांकित संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने समाजसेवक धम्म प्रचारक धम्मपुत्र तथा संजयकुमार खैरे ९८३३५७९८९९ यांचे कुटुंबीय,नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
