
विशेष प्रतिनिधी मुंबई:-रेशन कार्डसाठी लागू असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 2 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे रेशनिंग कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.आंदोलनानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने शहरी भागासाठी सध्या अस्तित्वात असलेले 59 हजार वार्षिक उत्पन्न ऐवजी 3 लाख 60हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा तसेच ग्रामीण भागासाठी वार्षिक 44 हजार ऐवजी 2 लाख 40 हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत 500 सह्यांचे अर्जा सोबत मागण्याचे निवेदन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव श्री.अत्राम यांची भेट घेऊन सादर करण्यात आले.

यावेळी शासनाच्या वतीने पुढील आश्वासने देण्यात आली.रेशन कार्ड उत्पन्न मर्यादा वाढीबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या १५ दिवसांत प्रकाशित करण्यात येईल.उत्पन्न मर्यादीच्या कारणावरून रेशन कार्ड रद्द करण्याची सुरू असलेली प्रशासकीय कारवाई थांबविण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात येईल.दरम्यान आंदोलनस्थळी भेट देणारे नामदार गिरीश महाजन आणि दादा भुसे कॅबिनेट मंत्री आणि विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनीही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत भेट घेतली . आंदोलनकर्त्यांच्या रेशन कार्ड उत्पन्न मर्यादा वाढीबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.रेशनिंग कृती समितीने शासनाच्या या आश्वासनांचे स्वागत केले असून, समितीचा अहवाल आणि शासन निर्णय निर्धारित कालावधीत जाहीर न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र लोकआंदोलन करण्याचा जगदीश पाटणकर- 9867551952 यांनी इशारा दिला आहे.या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, रेशन कार्डधारक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जगदीश पाटणकर- 9867551952,मुंबई यांस कडून

