
विशेष प्रतिनिधी विक्रोळी – अभय शिक्षण केंद्र,कन्नमवार नगर,विक्रोळी या संस्थेकडून ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विक्रोळी विभागातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.त्या निमित्ताने कर्तुत्ववान महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीची कार्यवाही,इतर महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल या जाणिवेतून सदर सत्कार करण्यात आला.विक्रोळी कन्नमवार नगर येथे अनेक वर्ष रहिवासी राहिलेल्या श्रीम.शिरिन संजू लोखंडे,सह आयुक्त कामगार,महाराष्ट्र राज्य, श्रीम.स्मिता गायकवाड,कायदा अधिकारी एम.पी.सी.बी.,डॉ.निलम साठे ई.एन.टी. सर्जन के.ई.एम.हॉस्पीटल, डॉ.अनिता खरात स्त्री रोगतज्ञ तसेच पत्रकार,कायदेतज्ञ, डेव्हलपर,अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला. जेष्ठ पत्रकार श्रीम.राही भिडे यांच्या हस्ते सदरचा सत्कार करण्यात आला.विक्रोळी विभागातील रहिवासी असलेल्या मा.आमदार डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड आणि मा. खासदार प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड या देखील उपस्थित होत्या.
या सत्कार प्रसंगी बोलताना सह आयुक्त शिरिन संजु लोखंडे यांनी सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आज सर्वजण या उच्च स्थानावर पोहोचलो आहोत तसेच महिलांकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कामगार कायदे घडवले; त्या कामगार कायद्यांची अंमलबजावणीचे काम मला करायला मिळाले आहे याचा खुप खुप अभिमान आहे.तसेच त्यांनी आपल्या माहेरच्या लोकांकडून सत्कार होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला आणि अभय शिक्षण केंद्र संचालकांचे मन:पुर्वक आभार व्यक्त केले.