राज्यात कामगारांसाठी ‘नाका शेड’ ची उभारणी करणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बातमी शेअर करा.

मुंबई :- राज्यात मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्ये नाक्यांवर कामगार मोठ्या प्रमाणावर असतात.नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते.अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल,अशी माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात (दि. 5 मार्च ) दिली.

बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला कामगार मंत्री फुंडकर यांनी उत्तर दिले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव,अमित देशमुख,राम कदम,विकास ठाकरे,योगेश सागर,अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी या योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगत कामगार मंत्री फुंडकर णाले,बांधकाम कामगारांची नोंदणी जलदगतीने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या कागदपत्रांची केवळ पडताळणी करण्यात येते.सध्या मंडळाकडून ३२ विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनांपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही,याची काळजी शासन घेत आहे.

बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे. बांधकाम कामगारांच्या मृत्यू,अपघात आणि विमा लाभांसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यामुळे अशा लाभांची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होईल आणि संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदत वेळेत मिळेल,असेही त्यांनी सांगितले.बांधकाम कामगारांना घरकुल वाटप गतीने करण्यात येईल.या प्रक्रियेत बदल करून प्रत्येक पात्र बांधकाम करणारा घरकुलाचा लाभ मिळेल.बांधकाम कामगार घरकुल लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेसमोर ठेवण्याबाबत शासनाचा विचार आहे.मध्यान भोजन योजना बंद करण्यात आली आहे.याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योजनेला पर्याय शोधण्यात येईल.बांधकामाच्या ठिकाणी पाळणाघर उभारण्याची आवश्यकता असलेली ठिकाणे निश्चित करण्यात येत आहे.आवश्यकता असलेल्या ठिकाणी पाळणाघर देण्यात येणार आहे. कामगारांना ईएसआय रुग्णालयात उपलब्ध होत असलेल्या आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी कामगारांना विशेषत्वाने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीने या घोषणेचे स्वागत केले आहे.

तालुका कामगार सुविधा केंद्रातील कंत्राटी कर्मचारी दलालाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे 

कामगार मंत्री कल्याणकारी योजनांची माहिती देतात.पण या कल्याणकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या खऱ्या कामगारांना कसा नाहक त्रास दिला जातो. त्याची तक्रार घेऊन कारवाई केली जात नसल्यामुळे लाखों खरे कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत.तालुका कामगार सुविधा केंद्रावर कंत्राटी कर्मचारी दलाला मार्फत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बोगस नांव नोंदणी करीत आहेत.दलालानी दिलेल्या ९० दिवसाच्या प्रमाण पत्राची विना चौकशी नोंदणी होत आहे. खऱ्या कामगारांना कंत्राटदारांच्या वर्क ऑडर ची कॉपी मागीतल्या जात आहे. भांडे वाटपात उघड उघड कमिशन बेस वर व्यवहार सुरू आहे. तालुका कामगार सुविधा केंद्र केंद्रातील कंत्राटी कर्मचारीआणि दलालांना वरिष्ट अधिकारी यांचा आशीर्वाद असल्यामुळे यांच्या विरोधात कुठे ही तक्रार करण्याची सोय राहिली नाही.मनमानी हुकुमशाही पद्धतीने कामगार नांव नोंदणी आणि भांडे वाटप काम सुरू आहे. याचे उदाहरण नांव नोंदणी अर्ज का नाकारला याचे कारण देणारा पुरावा कामगारांनी सागर तायडे यांना पाठविला आहे. काम केल्याचा कालावधी आणि प्रमाण पत्रावरील जावक क्रमांक दिनांक चुकीचा असल्याचे कारण दिले आहे.काम केल्यानंतर ९० दिवसाचे प्रमाण पत्र दिले जाते तर त्यावर ज्या दिवशी प्रमाण पत्र दिले त्याची दिनांक टाकली तर चुकीची कशी काय असू शकते. म्हणजेच हा खऱ्या कामगारांना जाणून बजून त्रास देण्याचा प्रकार आहे. कारण यामागे संघटनेच्या कामगारांकडून जास्त पैसे मागता येत नाही म्हणून अशा पद्धतीने त्रास दिल जातो.मान.कामगार मंत्री, मान.प्रधान कामगार सचिव,मा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई,यांनी या तालुका कामगार सुविधा केंद्रातील कंत्राटी कर्मचारी दलालाच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीने जाहीर आवाहन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *