
विशेष प्रतिनिधी मुंबई – सोमवार दिनांक १७/०३/२०२५. रोजी संध्याकाळी ४. वाजता संतोषीमाता हॉल. ठाणे पश्चिम येथे इंडियन असोसिएशन फॉर द हँडिकॅप आणि जे. एन.के.इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विघगाने दिव्यगांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विघमान अध्यक्ष मान.भीमराव नेरपगारे साहेब होते.जे.एन.के.इंडिया लिमिटेडच्या वतीने मान. प्रभू नलावडे,व समाजसेवक मान.रवी कामत उपस्थित होते. अध्यक्षाच्या वतीने मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संस्थेच्या कार्यांचे प्रास्तविक उपाध्यक्ष मान.सुरेन्द्र जाधव यांनी करताना संस्थेच्या वाटचालीचा एकूण कामाचा आढावा घेतला.संस्था गेली पंचवीस वर्ष दिव्यगांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप,स्टिक,व्हीलचेअर,छत्री,रेनकोट,व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य, शासन योजनांची माहिती दिव्यगांना पर्यंत पोहचविण्याचे कार्य करते.समाजातील दानशूर व्यक्ति सामाजिक संस्था विविध कंपन्या आणि आम्ही सर्व स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने काम करीत आहोत. आमच्या या कार्याला समाजातील दानशूर व्यक्तिनी मदत केल्यास आपण सत्कार्य केल्याचे समाधान मिळेल असे मत सुरेन्द्र जाधव यांनी व्यक्त केले.

सरचिटणीस माननीय प्रदीप तांबे साहेब यांनी जे.एन.के.इंडिया लिमिटेडचे मनपूर्वक आभार मानले.आपण दिलेल्या मदतीचा योग्य वापर होईल.अशी ग्वाही दिली. समाजातील दानशूर घटकांनी पुढे येऊन आमच्या कार्याला हातभार लावावा अशी विनंती केली.जे.एन.के.इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधि माननीय प्रभू नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष भीमराव नेरपगारे यांनी दिव्यगांना बरोबर अनाथ,विधवा,निराधार लोकांसाठी आपण काम करू असा संकल्प मांडला. आणि सर्वाना शुभेच्छा दिल्या.संस्थेचे खजिनदार माननीय चंद्रकांत सैदाने यांनी अतिशय जबाबदारीने कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले स्वयंसेवक प्रमोद, दीपाश्री,रूपाली आणि दिव्यगांन बरोबर आलेले पालक यांनी सहकार्य केले.सर्व दिव्यगांना अल्पोपार देऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप झाल्यानंतर सरचिटणीस प्रदीप तांबे यांना सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कालिदास रोटे ७२०८८९५०६१,यांस कडून
