उच्च न्यायालयाच्या आदेश नंतर ही कबुतरांना बेकायदेशीर दाणे टाकने चालूच आहे.

बातमी शेअर करा.

कबुतरांच्या विष्ठे मुळे मानवाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकायला बंदी घातली आहे. आणि कबुतर खाणे बंद करण्याचा आदेश दिला होता.परंतु त्याची अंमलबजावणी कुठे ही होतांना दिसत नाही. मुंबई विद्यापीठ कालिनच्या एक नंबर प्रवेश द्वारा जवळ काही व्यक्ती नियमितपणे कबूतरांना दाणे टाकतात.त्यामुळे जवळ राहणाऱ्या रहिवाशांना व बस स्टॉप वर उभे असणाऱ्या लोकांना त्रास होत असतो. त्याबाबत मराठी एकीकरण समिती चे नितेश शिंदे कालीना,सांताक्रुझ यांनी वारिष्ट पोलिस निरीक्षक बी.के.सी पोलिस ठाणे बांद्रा पूर्व यांना छायाचित्रासह निवेदन दिले आहे.पोलिस याकडे पाहतात पण कारवाई करतं नाही.उच्च न्यायालयाच्या आदेश नंतर ही कबुतरांना बेकायदेशीर दाणे टाकने चालूच आहे.असे नितेश शिंदे यांनी निवेदनात लिहले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *