
आजकालच्या पोरांना एक नवीन रोग जडलाय.खिशात गाडीत पेट्रोल टाकायला १०० रुपये नसतात,पण हातात १ लाखाचा ‘आयफोन’ घेऊन आरशासमोर सेल्फी काढायची हौस मात्र जबरदस्त असते.
मित्रांनो, ही श्रीमंती नाही, ही ‘भिकार’ लक्षणं आहेत.
ज्या बापाचा शर्ट फाटलाय आणि आईच्या साडीला दोन ठिगळ आहेत, त्यांच्या कष्टाचे पैसे किवा स्वतःच्या पगाराचा अर्धा हिस्सा ‘ईएमआय’ भरण्यात घालवणं, याला ‘स्टेटस’ नाही, याला ‘निर्लज्जपणा’ म्हणतात. तुम्ही घेतलेला तो १ लाखाचा फोन पुढच्या वर्षी २० हजाराला सुद्धा कोणी घेणार नाही. पण तेच पैसे जर सोन्यात किवा एखाद्या चांगल्या स्कीममध्ये ‘इन्व्हेस्ट’ केले असते, तर ५ वर्षांनी त्याची किमत दुप्पट झाली असती.
स्टारबक्समध्ये ३०० रुपयांची कॉफी पिऊन स्टोरी टाकण्यापेक्षा, टपरीवर १० रुपयाचा चहा पिऊन उरलेले २९० रुपये वाचवणारा माणूस खरा ‘स्मार्ट’ असतो.

लक्षात ठेवा, ‘ईएमआय’ वर केलेली हवा आणि फिल्टर लावून आलेलं रूप, हे दोन्ही पण पहिल्याच संकटाच्या पावसात धुवून निघतं. ज्याची स्वतःची कमाई आणि वडिलांची इज्जत शाबूत आहे, तोच खरा ब्रँड ! बाकी सगळे चायनीज आयटम आहेत.”
लोकांना तुमची आयफोन ‘रिगटोन’ ऐकायची नसते, त्यांना तुमची ‘यशाची कहाणी’ ऐकायची असते. त्यामुळे गॅझेट्स अपग्रेड करण्यापेक्षा स्वतःची ‘औकात’ अपग्रेड करा.हा लेख वाचून तुम्हाला राग येईल पण हे सत्य आहे या वर एकदा नक्की विचार करा कुणाचा मन दुखावण्याचा हेतू नाही.
हा लेख वाचणाऱ्याला (जर तो खरोखर शो बाजी वाला असेल तर) राग आलाच पाहिजे.तो त्यांचा राग लिहणाऱ्यावर नसून,ज्याला राग येतो त्याला स्वतः वर तो राग असेल. आणि स्वतः वर राग येणे म्हणजे अस्या भिकार सवई बद्दल स्व परीक्षण करणे होय….बाकी,मी जे लिहिले ते खणखणीत सत्य आहे. प्रत्येक माणसानी ह्यावर विचार करून आपले आचरण दुरुस्त करावे हीच खरी कसोटी आहे. ह्या कसोटीला जो पर करेल तो नक्कीच दुःख मुक्त होऊ शकतो.
प्रमोद सागर तायडे,मुंबई.
