स्वतंत्र मजदूर युनियनचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.बी.वानकर यांचे दुःखद निधन.

बातमी शेअर करा.

 मा. ज्ञानेश्वर बळीराम वानकर उर्फ डी.बी.वानकर यांचे मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता वयाच्या पंच्यात्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले. ते आकाशदर्शन बैकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज असोसिएशन चे संस्थापक महासचिव त्याचप्रमाणे स्वतंत्र मजदूर युनियनचे सुद्धा ते संस्थापक अध्यक्ष होते. आकाशवाणी नागपूर, दूरदर्शन नागपूर आणि आकाशवाणी लखनऊ या केंद्रांवर त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. फुले आंबेडकरी कामगार चळवळीचे देशातील एक अग्रगण्य पुढारी म्हणून त्यांची ख्याती होती. ते एक उत्तम वक्ता आणि उत्तम संघटक म्हणून ते सुपरिचित होते. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक चळवळीतील देशातील अनेक गणमान्य लोकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनाने देशातील फुले आंबेडकरी कामगार चळवळीचा एक खंबीर नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.त्यांना स्वतंत्र मजदूर युनियन व सर्व संलग्न संघटनांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *