बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनची राज्यस्तरीय कार्यकारिणीची व जिल्हा कार्यकारिणीची निवड.

बातमी शेअर करा.

रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी “बुदिष्ट मायनॉरिटी मिशन”ची राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा ठाणे येथे आयोजित  करण्यात आली होती.या बैठकीस राज्यातील २५ जिल्हा प्रतिनिधी व इतर सदस्य उपस्थित होते.ही बैठक माननीय आयु.राजाभाऊ कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रथम तथागत बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदना घेऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली.बैठकीचे सुत्र संचलन ऍड.अरियं बौध्द यांनी केले.
       आयु.रमेश धिवारे, सेवानिवृत्त मंत्रालय अधिकारी यांनी “बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन” ची भुमिका मांडली, मायनॉरिटी हा शब्द कुठुन घेण्यात आला,याविषयी सांगताना ते म्हणाले गोलमेज परिषदेत १९३२ मध्ये अल्पसंख्यांक उपसमितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती ती ब्रिटिशांनी कम्युनल अवॉर्ड मध्यें घोषित करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी मान्य केली होती.महात्मा गांधींमुळे स्वतंत्र मतदार संघ न देता संयुक्त मतदार संघ निर्माण करण्यासाठी पुणे करार करण्यात आला.त्यामुळे अस्पृश्य समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळु शकला नाही.
      तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे १९४९ मध्ये स्थापन केलेल्या “संविधान अल्पसंख्यांक समिती” मध्ये अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व करत असतांना सर्वच अल्पसंख्यांक समुदायांना प्रशासकीय सेवेत व विधीमंडळात आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.मात्र तिथेही समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल यांनी मागणी मान्य केली नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले माझ्या समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, वल्लभभाई पटेल यांनी सांगितले तुम्ही अनुसूचित जाती व जमाती साठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करा, त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमाती व ओबीसी यांचे साठी संविधानत तरतूद केली.मात्र अनुसूचित जाती व जमातीला मिळणारा अल्पसंख्यांकाचा दर्जा येथेही देण्यात आला नाही.

     येथेही अनुसूचित जातीला अल्पसंख्यांक दर्जा न देता.संविधान अनुसूचित जाती आदेश १९५० काढला मात्र या यादीला हिंदू धर्म जोडण्यात आला.त्यामुळे हिंदु महार म्हणूनच सवलती दिल्या जात होत्या.अल्पसंख्यांक दर्जा दिला असता तर,हा संवर्ग हिंदू धर्मापासुन स्वतंत्र व वेगळा झाला असता.मात्र याही वेळी बाबासाहेब आंबेडकरांना तडजोड करावी लागली.या दोन्ही ठिकाणी अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळु शकला नाही, मात्र १९९२ मध्ये केंद्र सरकारने अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा दिलेला आहे.सुरवातीपासून हिंदु धर्मापासून स्वतंत्र व वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अल्पसंख्यांक दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते पण ते त्यांच्या हयातीत मिळु शकला नाही,मात्र १९९२ मध्ये तो प्राप्त झाला असल्याने आपण मायनॉरिटी हा शब्द “बुदिष्ट मायनॉरिटी मिशन” मध्ये समाविष्ट केला आहे.ही सर्व माहिती आयु.रमेश धिवारे यांनी विषद केल्यानंतर. खालील प्रमाणे मिशनची राज्यस्तरीय कार्यकारिणीची व जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय कार्यकारणी:- अध्यक्ष- राजाभाऊ कदम,कार्याध्यक्ष- ऍड.अरियं बौद्ध, सरचिटणीस – रमेश धिवारे,मुख्य सल्लागार -ऍड.अशोकराज मोहोड,सचिव. – ऍड. वर्षा कांबळे,खजिनदार – योजनताई लोखंडे,राज्य उपाध्यक्ष- दामोदर गायकवाड – प्रभारी मुंबई प्रदेश,राजाराम मोरे – प्रभारी कोकण विभाग – शंकर खुने – प्रभारी मराठवाडा विभाग- रतन बनसोडे – प्रभारी नाशिक विभाग- विजय रोकडे- प्रभारी पुणे विभाग- संतोष इंगळे- प्रभारी अमरावती विभाग – प्रदीप सुरवाडकर- प्रभारी पश्चिम महाराष्ट्र.अशाप्रकारे मुख्य कार्यकारणी तयार करण्यात आली.जिल्हावर खालील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
संभाजीनगर जिल्हा- अध्यक्ष- आयुनि-सुनीताई हटकर,कार्याध्यक्ष- ऍड.अशोक तायडे, सरचिटणीस- आयुनि.पंचफुला खरात,पुणे जिल्हा- अध्यक्ष- विजय जगताप,कार्याध्यक्ष- प्रांजलताई जाधव,सांगली- अध्यक्ष – दिनेश कुदळे,बीड- अध्यक्ष-जे टी साळवे,कार्याध्यक्ष- सी एल आठवले,परभणी- अध्यक्ष – भूषण मोरे,नांदेड- अध्यक्ष- डॉ.रामचंद्र वनंजे,- कार्याध्यक्ष – बी बी गायसमुद्रे,- सरचिटणीस- दिपक गिरबीडे,जालना- अध्यक्ष- अंकुश कांबळे,सिंधु्दुर्ग – अध्यक्ष – रावजी यादव,अमरावती- अध्यक्ष – विद्या अडसर सचिव – दिपाताई कांबळे,नागपूर- अध्यक्ष- रेखाताई रामटेके,नवीमुंबई- अध्यक्ष – आशाताई जाधव,- सरचिटणीस- प्रवीण गांगुर्डे,धाराशिव- अध्यक्ष- रविराज ठोंबरे,कार्याध्यक्ष- कमलाकर सूर्यवंशी,सरचिटणीस- ऍड.ज्योती बडेकर,पालघर- अध्यक्ष- ना पा जाधव,या बैठकीत बौद्ध अल्पसंख्याक यांच्या हिताच्या दृष्टीने खालील प्रमाणे ठराव घेण्यात आले, ते एकमताने पास करण्यात आले.
ते खालीलप्रमाणे.

ठराव क्र- 1- महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना राज्य सरकार कडून “बौद्ध अल्पसंख्याक प्रमाणपत्र (Buddhist Minority Certificate)” देणेबाबत.
ठराव क्र.2- महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक अल्पसंख्याक समुदयास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे.
ठराव क्र – 3 धार्मिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अल्पसंख्याक अन्याय अत्याचार निवारण कायदा निर्माण करणे.
ठराव क्र.4 – विधान मंडळात अनुसूचित जाती, जमाती कल्याण समितीच्या धर्तीवर अल्पसंख्याक कल्याण समिती निर्माण करणे.
ठराव क्र.5 – जिल्हा अल्पसंख्यांक समित्यांवर बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक म्हणून आमच्या संघटनेचे प्रतिनिधित्व देण्यात यावे.ठरवास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ कदम यांनी सांगितले की जातींचे समूळ उच्चाटन करून भारत बौद्धमय करण्याचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प केला होता.हा संकल्प पूर्ण करण्याची संधी बौद्धांना मिळालेल्या मायनॉरिटी दर्जामुळे मिळाली आहे.या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी बौद्ध समुदयास केले.शेवटी सरणेत्तय घेऊन बैठकीची सांगता करण्यात आली.
                 आपले सहकारी
       राजाभाऊ कदम – ९७६८८३३८११ अध्यक्ष, बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन, महाराष्ट्र राज्य

रमेश धिवारे-सरचिटणीस,बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशन, महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *