
जगात तेलासाठी तिसरे महायुद्ध भडकतेय.इस्रायल अमेरिका जागतिक आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवून जगावर युद्ध लादू पाहतेय.लोकशाही आणि हुकुमशाही यातला फरक भारतीय पंतप्रधान मंत्रिमंडळ यांना कळेनासं झाला आहे.हजारो वर्षांचा भारत मित्र इराण (पर्शिया)यांना आम्ही भारतीय विसरलो.epstin फाइल मध्ये अत्यंत विकृत कोवळ्या मुलींच्या शोषणात अडकलेल्या अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि मोदी सुद्धा यांच्या महापांकडे दुर्लक्ष केल्याने आपला स्वयंपाक आणि हॉटेल मधला गॅस संपत आलाय.युद्धाचा थेट परिणाम आमच्या घरापर्यंत पोहचला.या आंतरराष्ट्रीय इराण आणि अमेरिकन युद्धाची चर्चा क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये नाही.अशा बुद्धिहीन विवेकशून्य तरुण भारताची अवस्था प्रत्यक्ष युद्धात काय असेल?कारण भारतात डिझेल पेट्रोल स्वयंपाक गॅस इतकेच प्यायचे “पाणी “सुद्धा महत्वाचे आहे.मागच्या आठवड्यात मी माझ्या अलिबाग तालुक्यात प्रवास केला.मुंबईला लागून असलेल्या आणि तिसरी मुंबई म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या. पनवेल उरण पेण अलिबाग रायगड जिल्ह्यात प्यायला पाणी नाही .ही विदारक स्थिती मी प्रत्यक्ष पाहिली.प्रत्येक गावाबाहेर आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसी तरुण क्रिकेट मॅच खेळत आहेत.क्रिकेट मॅच रंगात आल्यात.परंतु गावात भीषण पाणी टंचाई आहे.दोष कुणाचा?
स्वतःचा आई बहिणीच्या डोळ्यातलं पाण्याच्या दुष्काळामुळे आलेलं “पाणी” ज्यांना दिसत नाही.अशा तरुणांना पुत्र,भाऊ,पती,पिता,नेता कोणत्या नात्याचे “पुरुष “म्हणायचे? हाच तो रायगड जिल्हा जेथे छत्रपती शिवरायांनी आपली राजधानी बांधली.समुद्राच्या पाण्याची भरती ओहोटी जानणाऱ्या या आगरी कोळी भंडारी सागरपुत्र आरमारी राजाने, जागतिक सत्ता असलेल्या इंग्रज फ्रेंच मोघल यांना सागरी आरमाराचा हिसका दाखवून समुद्रात बुडविले होते.हे मराठा आरमार नव्हते.ते सागरी ओबीसी शूद्र आगरी कोळी भंडारी आरमार होते. इथल्या ओबीसी तरुणाईला घेऊन लढणारा हा रयतेचा राजा जमीनवरच्या आणि समुद्रातल्या पाण्याबरोबरच देशातल्या समस्त स्त्रियांच्या डोळ्यात पाणी येऊ नये.त्यांची इज्जत हीच राष्ट्राची शान आहे.असा राष्ट्रवाद सांगून गावातल्या प्रत्येक जिजाऊ एकवीरा यांच्यासाठी मैदानात, तरुणांना रक्त सांडण्यासाठी तानाजी मालुसरे आणि शिवा काशिद होण्यास प्रोत्साहित करत होता.
छत्रपती शिवरांचे रयतेचे स्वराज्य बुडवून आलेली मनुवादी पेशवाई ही आम्हास म्हणजे आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या शूद्र लोकांस पाणी, जमीन ,जंगल नाकारत होती.छत्रपती शिवराय यांची समाधी शोधून त्यांचा स्त्री शूद्र अतिशूद्र रयतेचा विचार महाराष्ट्राला सांगणारे महात्मा जोतिबा फुले.त्यांनी महाराष्ट्रात प्रथम पाण्यासाठी विहिरी आमच्या शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी मोकळ्या केल्या.शिक्षण ब्राह्मण मुक्त करून, आमच्यासाठी स्त्री शिक्षणाची सुरुवात माता सावित्रीमाई यांच्या कडून केली.तेव्हा कुठे होती सरस्वती? यांचं सावित्री ज्योती फुले यांना आपले गुरु म्हणून भारताचे संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे आंदोलन रायगड जिल्ह्यात चेतविले.निसर्गाचे, पावसाचे पाणी हा सर्व प्राणी,पक्षी आणि मानव यांचा नैसर्गिक अधिकार असताना. त्यावर मनुस्मृती धर्माने केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची हुकुमशाही लागू करणारा वैदिक ब्राह्मणी धर्म फाडून टाकणारा,शिवरायांचा मावळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आबेडकर होय.त्यांना कोकणात साथ देणारे आरमारी मावळे म्हणजे आगरी कोळी भंडारी ओबीसी तरुण होते. हा आमचा इतिहास आहे.
आज याच रायगड जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ सुरू झालाय.तरुण गावाबाहेर क्रिकेट खेळतात.त्यांना घरातला प्रश्न कळत नसेल? तर इराण अमेरिका तेल प्रश्न कसा कळणार?. परंतु युद्ध भारताच्या समुद्र किनाऱ्याजवळ पोहचले आहे. इराणचे नौदल लढाऊ जहाज अमेरिकेने जागतिक युद्ध नियम मोडून श्रीलंकेजवळ बुडविले.आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या इराणच्या लोकांना मदत नाकारणे, भारतासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.कुठे गेले “अतिथी देवो भव?” epstein फाइल या जागतिक लफड्यात पूर्ण अडकलेले आपले पंतप्रधान यावर बोलू शकत नाहीत?. परंतु देशाला धोका आहे.हे आम्ही ओबीसी तरुणाईने ओळखले पाहिजे.या युद्धामुळे पेट्रोल डिझेल स्वयंपाक गॅस यांचा तुडवडा दिसू लागला आहे.महागाई भडकतेय.लोकसभेत चर्चा सुरू झाली.रायगडची आगरी कोळी ग्रामसभा गावकी यावर चर्चा करणार की नाही?.

आम्ही छत्रपती शिवराय महात्मा फुले डॉ बाबासाहे आंबेडकर यांच्या मार्गाने जाणार नसू ?तर देश धोक्यात आहेच.परंतु आपले घर गावठाण धोक्यात आहे. हे ओबीसी तरुणाईने जाणले पाहिजे.या देशात आमचे हक्कांचे पाणी जमीन जंगल शिक्षण आरक्षण राजकीय सत्ता चोरमारे उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत.हे मनुस्मृती धर्माचे कटू सत्य आगरी नेते नारायण नागू पाटील यांनी चरी अलिबाग येथील जागतिक शेतकरी संप करून आम्हास सागितले. रायगड जिल्ह्यातील चरी शेतकरी संप.चिरनेर जंगल सत्याग्रह,चवदार तळे पाणी हक्क आंदोलन,मनुस्मृती दहन या संघर्षात आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य यांच्या हुकुमशाही विरोधात लढणारे छत्रपती शिवरांचे आरमारी मावळे आहोत.कोकणात धो धो पाऊस पडतो.हे पाणी आम्ही का जपत नाही?. घराजवळ जमिनीत टाक्या,विहिरी शेतकी तळे बाधून पाणी का साठवीत नाही?. हा प्रश्न मनाला विचारा. रायगड किल्ला त्यातील पाणी व्यवस्थापन पहा,बौद्ध लेणी त्यातील २००० वर्षे जुनी पाणी व्यवस्था पहा.त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात ६० टक्के पाणी ऊसाच्या पिकाला पळवणारे उच्चवर्णीय मराठे सत्ताधारी समजून घ्या.
ओबीसी तरुणांनी ही पहावे कोकणातली धरणे गाळ साचून भरली? त्यातील पैसे खाणारे चोर पकडा.. सत्तर हजार कोटींचे पाणी चोर कुणी सोडले?.ब्राह्मण मराठा राजकीय युती आजही आम्हास पाण्यासाठी आमची गावठाणे उपाशी ठेवत असेल?,तर परखड बोलायला शिका.मोबाईल घेऊन फेसबुक लाईव्ह करून गावातला पाणी प्रश्न पंतप्रधान, मुख्यमंत्री,आमदार खासदार यांना दाखवा.माझ्यासाठी नाही.तुमची आई,बहीण,मावशी,आजी,पत्नी,मैत्रीण या घरातल्या आई एकवीरा,राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि तुमच्या माझ्या आईसाठी..भारत माते साठी. क्रिकेट मॅच थांबवून पाणी प्रश्नावर लढू या..चवदार तळे आंदोलन आठवून डॉ.बाबासाहे आंबेडकरांचा “पाणी विचार” घरा घरात पोहचवू या..
जय एकवीरा.जय जिजाऊ.जय भीम.जय भारत.जय संविधान.
राजाराम पाटील- ८२८६०३१४६३.
उरण जिल्हा – रायगड.

