“ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर स्वाभिमानाची लढाई आहे…!”

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी – दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी व्हावी, ही मागणी गेली अनेक वर्षे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी सातत्याने करत आहेत. मात्र, या न्याय्य मागणीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने आता या मागणीने तीव्र स्वरूप धारण केले आहे. “ही केवळ पुतळ्याची नव्हे, तर स्वाभिमानाची लढाई आहे…!”
या न्याय्य मागणीसाठी आजपासून दिवा शहरात बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मा. सुवर्णाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्ते मा.सौरव अडागळे तसेच इतर कार्यकर्त्यांनी दिनांक 02/08/2026 रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कवि  आयु. र. वि.माळापुडेकर आणि त्यांचा मुलगा संविधान उपोषणस्थळी उपस्थित राहिले.

उपोषणकर्त्यांचे धम्मशाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि दिवा शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा, अशी मनःपूर्वक अपेक्षा व सदिच्छा व्यक्त केल्या.
आयु. र. वि.माळापुडेकर,मो. नं. 8691883214.दिवा शहर ता. जि. ठाणे. मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *