स्वतःला ओबीसींचे नेते म्हणवणाऱ्यांना काही थेट प्रश्न!.

बातमी शेअर करा.

जर तुम्ही खरोखर ओबीसींचे नेते असाल,ओबीसींच्या हिताची जाणीव असेल,तर जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घर गणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम का नव्हता?. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी स्वतंत्र नोंद का नव्हती? या प्रश्नासाठी किती ओबीसी नेते रस्त्यावर उतरले?
किती राजकीय पुढाऱ्यांनी सरकारला जाब विचारला?.किती सामाजिक कार्यकर्त्यांनी घरगणनेतील ओबीसींच्या नोंदीसाठी आवाज उठवला?.किती जणांनी स्वतःची माहिती देऊन या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली?.ओबीसींच्या न्यायासाठी संघर्ष करण्याची वेळ आली की अनेक जण शांत का होतात?.

सरकारच्या भूमिकेला विरोध करणे म्हणजे सरकारचा विरोध नव्हे; अन्यायाला विरोध करणे म्हणजे संविधानिक हक्कांसाठी संघर्ष होय.जोपर्यंत तुम्ही सत्तेच्या गुलामीची मानसिकता स्वीकारता, तोपर्यंत सत्ता तुम्हाला न्याय देण्यासाठी स्वतःहून पुढे येणार नाही.तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी स्वीकारली नाही.त्यांनी आपल्या लेखणीतून गुलामगिरीला उत्तर दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा मार्ग दिला.मग आपण या महापुरुषांकडून नेमके काय घेतले?फक्त “शिव फुले शाहू आंबेडकर” म्हटले म्हणजे विचार आत्मसात झाले का? महापुरुषांच्या नावाचा जयघोष करणे सोपे आहे.पण त्यांच्या विचारांसाठी नाईक भूमिका घेणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि संघर्ष करणे कठीण आहे.

गरीब,वंचित आणि सामान्य ओबीसींच्या न्यायासाठी आपण किती वेळा रस्त्यावर उतरलो?आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून संघर्षासाठी किती वेळा बाहेर पडलो?की फक्त स्वतःला “नेता” म्हणवून घेण्यात आणि मोठ्या नेत्यांची चाटुगिरी करण्यातच आपले आयुष्य गेले?.ओबीसी समाजाला घोषणांचे नेते नकोत;ओबीसींच्या न्यायासाठी संघर्ष करणारे नेतृत्व हवे!
जय शिवराय! जय क्रांतीज्योती! जय भीम!
जय संविधान! जय ओबीसी!
भरत परशुराम निचिते-7666033190,
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे प्रचारक
सामाजिक ओबीसी कार्यकर्ता व उपोषणकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *