
लिंगपिसाट अशोक खरात हा आमचा गुरू आहे.म्हणून आम्ही त्याची पूजा करतो.त्याच्यावर छत्री धरतो.अशा प्रकारचे जाहीर वर्तन महिला आयोगाच्या अध्यक्षा करतात.त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रीमंडळ लोकांना दिसते.त्यावेळी आम्ही आमचे वर्तमान आणि आमचे भविष्य नुसत्या मूर्ख लोकांच्या हाती दिलेले नसून लिंगपिसाट सत्ताधारी लोकांच्या हाती दिले आहे.याची लाज,आज प्रत्येकाला वाटते आहे.Epstein फाइल मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प अडकले.त्यात जगातील सत्ताधारी नेते दिसले.आमच्या पंतप्रधान आणि काही उद्योजक मंडळींची नावे दिसली. साऱ्या जगाने मानवी नीतिमत्ता गमावली आहे.त्यात भारताचे नाव आहे.याची लाज महाराष्ट्राला वाटली असावी?.मराठी पाऊल लैंगिक भ्रष्टाचारात epstin फाइल प्रमाणे पुढेच पडते? हे खरात चाकणकर “ब्रँड “ने दाखवून दिले.आम्ही आमच्या तरुण मुला मुलींना काय आणि कोणता आदर्श या चर्चेतून देणार आहोत?. हा लिहिण्याचा बोलण्याचा विषय नाही.तुमची माझी मुले ही चर्चा पाहत आहेत.त्याच्याजवळ आमच्या नेतृत्वाच्या चुका मोठ्या मनाने कबूल करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्याचप्रमाणे खरी जीवन मूल्ये काय आहेत? हे सांगण्याची ही भयंकर स्थिती आपल्यावर आली आहे.
पुढल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती येतेय.महाराष्ट्रात देशात आणि साऱ्या जगात या महान नेतृत्वाच्या विचारांवर भाषणे होतील.मलाही काही सभांचे निमंत्रण आहे.कुणी कितीही लपविले तरी महाराष्ट्राला लज्जा उत्पन्न करणारी epstin आणि खरात फाइल लोकांच्या नजरेआड करता येणार नाही.म्हणूनच यावर चर्चा झाली पाहिजे.यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.महाराष्ट्र शासन आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाच्या अब्रूचे धिंडवडे उडविणारी ही चर्चा आहे.
अंधश्रद्धेच्या मंदिरात बसलेला बुवा बाबा अशोक खरात जेव्हा आपल्या लैंगिक शोषण परंपरेत महाराष्ट्राच्या अर्ध्या मंत्रिमंडळास आपले शिष्यत्व देऊन भारताच्या गुरु शिष्य परंपरेला बदनाम करतो.तेव्हा या प्रकरणाचा चेहरा असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे वाक्य आपले लक्ष वेधून घेते.भोंदू बाबाला अशोक खरात याला त्या आपल्या “गुरु” मानतात.या अत्याचारी बाबाला पोलिसांनी आता अटक केली आहे.महिलां वरील अत्याचार ही तेहतीस कोटी देव आणि त्यांचे भोंदू बाबा शेठजी भटजी असलेल्या वैदिक ब्राह्मणी हिंदू मनुस्मृती धर्माची दुष्ट पद्धत सर्वांना माहीत आहे.हजारो वर्षांची स्त्री शोषकी, स्त्री शूद्र अतिशूद्र शोषक वृत्ती, ही हिंदूधर्म परंपरा नाकारून,धर्म चिकित्सा आपल्याकडे बुद्ध चार्वाक महावीर यांनी २५०० वर्षापासून सुरू केली.अलीकडे नव्या भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याची नव्याने मांडणी महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री माई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.भारतीय संविधानाने जी भारतीय नागरिकांच्या नव्या जीवन पद्धतीची मांडणी केली आहे ती मनुस्मृती विरोधाची मांडणी आहे.अंधश्रद्धेच्या विरोधी नव्या विज्ञानवादी विचारसरणीची मांडणी आहे.
भोंदू बाबा लिंगपिसाट अशोक खरात याला गुरू मानणाऱ्या रुपालीताई चाकणकर या फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान यांची समान अर्थाने नावे घेतात?. यातला फरक आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवला पाहिजे.अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,अशोक खरात यांच्या फोटोत दिसणारे खासदार सुनील तटकरे,चंद्रकांत दादा पाटील आणि इतर छोटे मोठे नेते यांना मनुस्मृतीचे समर्थक बुवा,बापू,नाना,दादा आणि फुले,शाहू, आंबेडकर भारतीय संविधान यातला फरक सांगण्याची ही वेळ आहे.लिंगपिसाट अशोक खरात याला गुरू मानणारा कोणताही स्त्री पुरुष हा फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान वादी विचारांचा कसा असू शकतो?.अर्थात फुले आबेडकर यांचा विचार हा अंधशद्ध हिंदू धर्म चिकित्सक बुद्ध चार्वाक महावीर यांचा आधुनिक विज्ञानवादी विचार आहे.स्त्री विरोधी ओबीसी एससी एसटी विरोधी हिंदू ब्राह्मणी धर्म सोडून देणारे डॉ.बाबासाहेब आंबेकर भारतीय संविधान हे आमचा आदर्श असतील ? तर चाकणकर ताई आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी अशोक खरात याला गुरू ठरविणारा स्त्री विरोधी धर्मही सोडला पाहिजे.केवळ आपल्या साविधानिक पदे आणि राजकीय पक्ष पदांचे राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही.
आपल्याकडे विचार आणि आचार निष्ठा जपणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्याची ही आंबेडकर जयंती आहे.महाराष्ट्रातल्या वक्त्यांची ही मोठी जबाबदारी आहे.स्त्रीयांची प्रतिष्ठा जपणारा राजा छत्रपती शिवराय आज महाराष्ट्राला सांगायला हवा.महाराष्ट्राच्या माता भगिनी यांना माना खाली घालायला लावणारा केवळ अशोक खरात हा एकटाच भोंदू बाबा नाही.त्याला मानणारे तमाम शिष्य अंधभक्त हे संविधान विरोधी आहेत.भारतीय संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. (fundamentl Duty) मानले गेले आहे.भारतीय संविधानाच्या आर्टिकल ५१- अ (h) मध्ये वैद्न्यानिक दृतिकोनचा दृष्टीकोन आढळतो.वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी,सुधारणावाद यांचा विकास करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असेल.हे कलम आपणास केवळ माहिती मिळविण्यास सांगत नाही.तर विचार करण्याची एक पद्धत शिकवते.वैज्ञानिक दृष्टिकोन.(scientific Temper) कोणत्याही गोष्टीवर अंधश्रद्धेपोटी विश्वास न ठेवता ती पुराव्याच्या आणि तर्काच्या निकषावर तपासून पाहणे.मानवतावाद (Humanism) माणसाला केंद्रस्थानी ठेऊन दयेची आणि समतेची भावना जोपासणे.शोधकबुद्धी (spirit of inquiry) प्रश्न विचारणे आणि सत्याचा शोध घेणे.सुधारणावाद (Reform) जुन्या आणि जाचक रूढी परंपरा सोडून समाजाच्या हितासाठी बदल स्वीकारणे.
जय आई एकवीरा,जय जिजाऊ,जय सावित्री,जय संविधान,जयभीम,जय ओबीसी.

