
“कोळी बांधव आणि बौद्ध धर्म यांचा परस्पर संबंध गौतम बुद्धांच्या आईच्या (महामाया) कोलिय वंशाशी जोडला जातो. बुद्धांचे विचार आणि मानवी हक्कांच्या चळवळीतही या समाजाचे मोठे योगदान राहिले आहे.येथे कोळी समाजाचा बौद्ध परंपरेशी असलेला ऐतिहासिक दुवा आणि महत्त्व दिले आहे. कोलिय वंश आणि कोळी समाज
गौतम बुद्धांची आई: गौतम बुद्धांची आई महादेवी या कोलिय वंशाच्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते, ‘कोलिय’ म्हणजेच प्राचीन ‘कोळी’ जमात होय.प्राचीन वस्ती: कोलिय वंशाचे राज्य प्राचीन भारतातील कपिलवस्तु जवळ (सध्याच्या नेपाळ आणि बिहारच्या सीमेवर) होते. ते लोक शेती आणि मासेमारी करत असत.
नालासोपारा विशेष प्रतिनिधी :- तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या नालासोपारा (प्राचीन नांव सुप्पारक) येथून सम्राट अशोकांची कन्या भिक्खुणी संघमित्रा महाथेरी हिने बुद्धगया येथील प्रवित्र बोधी वृक्षाची फांदी घेऊन इ.स पूर्व तिसऱ्या शतकात श्रीलंकेला प्रयान केले होते. कोळी समाजाच्या होडीने संघमित्रा महाथेरीयांच्या श्रीलंका प्रयान दिनानिमित्त नालासोपारा येथील कळंब बीचवर इंडो श्रीलंका विरासत हा लक्षवेदी प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.संघमित्रा गंधकुंटी बुद्ध विहार ट्रस्ट नालासोपारा आणि इंडो श्रीलंका विरासत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला श्रीलंका व भारतातील विविध भागातील पूज्य भंते,भिक्खुणी व धम्म उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दरवर्षी आषाढ महिन्यातील आषाढ पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो.पण आषाढ महिन्यात पावसामुळे समुद्राला तुडुंब पाणी असते म्हणून त्या अगोदर २४ मे २०२६ ला संघमित्रा श्रीलंका प्रयाण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महाथेरी भिक्खुणी संघमित्रा यांच्या प्रयाणाचा लक्षवेधी प्रतिकृती देखावा सादर करण्यात आला.यावेळी कळंब बीचवर कोळी बांधवांनी दोन बोटी उत्तम प्रकारे सजवल्या होत्या, त्या दोन बोटीने संघमित्रा व भिक्खुणी संघाला श्रीलंकेला घेऊन जात आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी सम्राट अशोक आणि राणी विदिशा प्रतिकात्मकरित्या वेशभूषा केलेले धम्म उपासक उपासिका भिक्खुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचं बरोबर श्रीलंकेचा राजा व राणी भिक्खुणी संघमित्राचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते असा,प्रतिकृती देखावा कळंब बीचवर सादर करण्यात आला.त्यात ऐरोलीच्या जेष्ट धम्म उपासीका शशिकला जाधव ताई यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका धम्म उपासीका ग्रुपने श्रीलंकन लुक मधील उपासिका अरुणा अहिरे,कविता हिवाळे,पल्लवी शिंदे,प्रज्ञा आढाव,पुजा आपटे,सुनिता तायडे,लक्ष्मी शेंडगे, संघमित्रा अहिरे,मनश्री तांबे,दिया अहिरे,कमल देशपांडे,शिवानी (राणी विदिशा)श्रीलंकन धम्म उपासिकांची लक्षवेधी वेशभूषा करून स्वागत केले.

नालासोपारा येथिल प्राचीन बौद्ध स्तुपावर सकाळी १० वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली.त्यानंतर धम्म देशना,प्रवचन झाले.१२ वाजता भिक्खु संघ भिक्खुणी संघ यांना भोजन दान देण्यात आले. धम्म उपासक उपासिकांच्या भोजना नंतर ३ वाजता बौद्ध स्तूप ते कळंब बीच रैली काढण्यात आली.ताज प्लेज रिसॉर्ट ते कळंब बीच बोटीवर भिक्खुणी संघाची धम्म यात्रा निघाली.बोटीवर भिक्खुणी संघ संघमित्रा सोबत बसल्यावर त्यांना प्रतिकात्मकरित्या निरोप देण्यात आला.समुद्रात फिरून आल्या नंतर भिक्खुणी संघमित्राच्या भिक्खुणी संघाचे श्रीलंकेवरून परत आल्याचा प्रतिकात्मकरित्या आगमनचे स्वागत करण्यात आले.आणि तिसऱ्या शतकातील हा प्रभावी लक्षवेधी प्रेरणादायी देखावा निर्माण करण्यात आला.त्यांचा लाभ उपासक उपासिकांच्या ग्रुपने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ बनवून व छायाचित्रे काढून मोठ्या उत्स्फुर्तपणे सेव्ह केला.

भारतातील बुद्धधम्म टिकवून ठेवण्यासाठी बुद्ध धम्माची परंपरा प्रथा व संस्कार यांचे जतन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते.असे भिक्खुणी संघमित्रा यांनी सांगितले.बुद्ध धम्मात भिक्खु संघ आहे.पण भिक्खुणी संघ अध्याप नाही. भिक्खुणी संघाची स्थापना करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.भिक्खु-भिक्खुणी संघाचे अनेक धम्म उपासक उपासिका व मान्यवरांनी स्वागत केले.समता सैनिक दलातर्फे बोधि वृक्षाला सलामी देण्यात आली.या कार्यक्रमाला वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव यशवंत पाटील,उपमहापौर मार्शल लोपीस,नगरसेवक परेश किणी,प्रा.धम्मदर्शन,भन्ते राहुल मित्र,डॉ. प्रफुल लोखंडे,दैनिक सम्राटचे कुणाल कांबळे,पत्रकार सागर तायडे,विजय कसबे,रेखाताई कांबळे,प्रा.संजीवनी साळवे,भांडुप धम्म उपासिका संघाच्या ज्योती थाटे,सुनिता तायडे,चंद्रकला तायडे,अंजना वानखडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित बौद्ध भिक्खू संघाच्या हस्ते महापौर,उपमहापौर आणि नगरसेवकांना सन्मानचिन्ह,शिवश्री सुधाकर लाड लिखित एक संशोधनात्मक ऐतिहासिक दस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी योगदान देणारा भूमिपुत्र मूलनिवासी कोळी समाज ही स्मृतीपुस्तिका आणि पवित्र कमळाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला.धम्मपिठावरुण बोलताना मान्यवरांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्राचीन बौद्ध वारसा आणि नालासोपारा शहराचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकला. सम्राट अशोक आणि त्यांच्या सुकन्या संघमित्रा यांनी धम्माच्या प्रसारासाठी केलेले त्याग आणि कार्य आजही संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे आहे,असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.या सोहळ्यासाठी मुंबई,ठाणे,बदलापूर नाशिक, पुणे,पनवेल,रायगड,भांडूप,एरोली,खरघर व संपूर्ण नालासोपारा परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्राट अशोकांची कन्या संघमित्राला श्रीलंकेला होडीने जाण्यासाठी मदत करणारा कोळी बांधव यांचे सिद्धार्थ गौतम बुद्ध व बुद्ध धम्माशी विशेष नांत आहे.हा प्रतिकात्मक प्रयान दिन साजरा करण्यासाठी आगरी कोळी समाजाचे विचारवंत नेते राजाराम पाटील यांच्या योगदानातून स्थानिक कोळी बांधवांनी मोठ्या प्रमाणात धम्म दान गोळा करून दिले.त्याचा बरोबर उल्हास केणी यांचा ताज पॅलेस प्रतिक बीच रिसॉर्ट दोन दिवस भिक्खु-भिक्खुणी संघाच्या राहण्यासाठी व कार्यक्रमासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे सम्राट अशोकांची कन्या भिक्खुणी संघमित्रा महाथेरी यांच्या श्रीलंका प्रयाण दिना निमित्ताने नालासोपारा येथे इंडो श्रीलंका विरासत कार्यक्रम यशस्वी झाला.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून नालासोपारा

