
स्मशान भूमीत भुत पिछात राहतात मेलेल्या माणसांची आत्मा तिथे वास करते ही बहुजन समाजात हजारो वर्षे पासुन खोटी अंधश्रद्धा पसरविण्यात आली.जगात सर्व प्रथम या खोटी मान्यतेच्या विरोधात तथागत बुद्ध यांनी आवाज उठवला त्यांच्या नंतर अनेक संत महापुरुष यांनी सांगितले.देव देवळात नसुन माणसात आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी सांगितले आज त्या देव माणसाला भेटण्याची त्यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.
काल जवळच्या नातेवाईक कालकथीत निलेश भगवान कठाडे यांचे अल्पसा आजाराने निधन झाले त्यांच्या अंतिम यात्रे मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी घरून निघालो सकाळ ची नऊ वेळ दिली असल्यामुळे मला वाटेतच उशीर झाला म्हणून मी सरळ स्मशान भूमीत गेलो मी माझी गाडी झाडाच्या सावलीत उभी करीत असतानाच अश्शी पंच्याशी वर्षं चे बाबा हसत व प्रशनन मुद्रेने हातात पाण्याची बाटली घेऊन आले आणी मला म्हणाले या साहेब, घ्या पाणी मी त्यांना जयभीम घातला त्यांनी सुध्दा मला मोठ्या आदराने जयभीम घातला आणी स्मशान भूमीत ठेवले बाकावर बसण्यास विनवी केली ज्या बेंच वर आम्ही बसणार होतो तेवढ्यात बाबा म्हणाले साहेब थोडं थांबा बेंच वर धुळे बसली आहे. ते साफ करतो त्यांनी लगेच आपल्या गळ्यातील रूमाल काढुन बेंच साफ केला आणि ते म्हणाले साहेब आता बसा आम्ही दोघे ही बेंच वर बसलो मी विचार करू लागलो की यांना मी कधीही पाहिले नाही.यांची व माझी ही पहिलीच भेट आहे. येवढे आदर तिथं जे एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईक यांना देत नाही. हा विचार मनात करीत असतांनाच त्यांनी मला विचारना केली साहेब आपण कुठुन आला, मी त्यांना माझ्या परिचय दिला. नंतर मला असे वाटले हे सुध्दा ज्या मयत साठी मी आलो आहे. त्यासाठी हे सुध्दा आले असतील मी त्यांना विचारणा केली आपण कुठुन आलात त्यावर कांशीराम तायडे साहेब यांनी सांगितले साहेब मी इथालच आहे.मी रिटायर्ड झाल्या नंतर गांवावर आलो आहे. मी त्यांना म्हटले सर्विस झाल्यावर इतर रिटायर्ड लोक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शहराकडे जातात तुम्ही गांव निवडले?. त्यावर कांशीराम तायडे म्हणाले सरकारी नोकरी करीत असताना मी संपूर्ण देश फिरलो देश सेवा केली आता गांवाची सेवा करायची आहे!.

मी शुन्य नजरेने बघत होतो ते पुढे म्हणाले साहेब माझी पत्नी जिवंत असताना मला सांगत होती की आपल्या गावातील स्मशान भूमीत महादेवाची प्रतिमा बसवा मी ठिक आहे म्हणून वेळ मारून नेत होतो त्यांच्या अवघ्या दिड महिन्यात तीचा मृत्यू झाला तिची हयातीत अपुर्व राहीलेली इच्छा पुर्ण करण्यासाठी मी ही शंकर महादेव यांची प्रतिमा लावलेली आहे. तेव्हा पासून मी स्मशान भूमीत बेंच,झाडे,फुलबाग,रस्त्याच्या दोन्ही बाजूला निमसरय विविध प्रकारच्या फुल झाडे लावुन त्यांना सकाळ संध्याकाळ पाणी घालण्याचे काम मी व माझ्या दोघे सहकारी करीत असतो.गांवात कुठल्याही जाती पंथाच्या लोकांना स्मशान भूमीत आल्यानंतर गैरसोय होवु नये म्हणुन सर्व साहित्य उपलब्ध करून देतो.माझे वडील किसन तायडे यांच्या स्मरणार्थ प्रेतला विसावा घेण्यासाठी चबुतरा बनविला आहे तेथे नेवुन दाखविले संपूर्ण फुलांनी बहरलेली स्मशान भूमी तायडे साहेब मला दाखवत होते. मी ते पाहत असताना अशा भास होत होता की मी कुठल्या तरी बगीच्यात फिरायला आलो आहे.स्मशान भूमीतील रास्त्याच्या झाडाच्या खोडाशी पक्षी यांना पाणी ठेवले होते. सर्व झाडावर असंख्य पक्षी गोजारवण किलबिलाट करत होते, तर इतर पक्षी तायडे साहेब यांनी टाकलेले अन्न टिपुन खात होते.

मी त्यांना म्हटले तायडे साहेब तुम्ही स्मशान भूमी बद्दल ची भिती जी सर्व जनमाणसामध्ये आहे जी इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली ती भीतीच नाहीसी करत आहेत. त्यावरून त्यांनी सांगितले अगोदर लोक एकडे येण्यास घाबरत होते आता मात्र शांती मिळावी म्हणून येत आहेत. दर बुधवारी रात्री स्मशान भुमी मध्ये आम्ही दहा पंधरा लोक मिरची भांजी ठेवुन समुहाने भोजन घेत आहोत. हा कार्यक्रम रात्री 11 वाजे पर्यंत चालतो. आम्ही गावातील अनेक लोकांना जेवणासाठी आमंत्रित करतो आहे परंतु बरीच लोक भीती पोटी जेवणाला येत नाही.
मी त्यांचे बोलणे ऐकत होतो स्मशान भूमीच्या विविध फुलांच्या माळा झाडे यांनी वेढलेला तो परीसर शहरातील किंवा पर्यटन स्थळा पेक्षा स्वच्छ व सुंदर होता.ज्या कांशीराम तायडे यांनी सरकारी नोकरीतुन देश सेवा केली रिटायर्ड झाल्या नंतर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शहराकडे न जाता गांवाकडे येवुन स्मशान भूमी ला सुशोभित करून मानव सेवेचे व्रत धारण केले,एकदाच चांदुर बिस्वा येथील स्मशानभूमी ला भेट देऊन मन प्रसन्न झाले.प्रत्येक गावात असे कांशीराम तायडे असले पाहिजेत त्यांना मी भिम सैनिक संजय इंगळे बेलाड कडुन त्यांच्या कार्यास मानाचा क्रांतीकारी जयभीम करतो.
भवतु सब्ब् मंगलम्
आयु.संजय इंगळे -९०१११७३५०८,बेलाड तालुका मलकापुर,जिल्हा बुलढाणा.

