
विशेष प्रतिनिधी – बोरिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मधील राजेंद्र नगर मधील शिवाजी नगर विभागाततील सार्वजनिक शौचालयात झालेल्या भ्रष्टाचारावर आज स्थानिक महिलांनी हल्ला बोल केला.
शौचालयाच्या मूळ जागेवर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत घरे बांधून ठेवली आहेत, व आता पालिका या बाजूच्या छोट्या शौचालयाला तोडून नवीन दोन मजली शौचालय बांधणार असल्याचा बॅनर पालिकेने लावला, त्यात हे शौचालय धोकादायक असून ते तोडणार असून याचा वापर कोणी करु नये असा उल्लेख केला आहे.

स्थानिक महिला या विरोधात एकत्र आल्या व त्यांनी हा बॅनर फाडून घोषणा दिल्या की पालिका कोणाच्या फायद्यासाठी हें बांधकाम करत आहे, जर पालिकेला शौचालयाचे बांधकाम करायचे असेल तर त्यांनी शौचालयाच्या मूळ जागेवर जिथे स्थानिक भाजपा कार्यकर्त्याने कब्जा केला आहे त्यावर करावे,आताचे शौचालय तोडू नये, हे तोडले तर स्थानिकांचे हाल होतील, हे तोडण्यापेक्षा मूळ खऱ्या जागेवर नविन शौचालय बांधावे, मगच हें दुरुस्त करून त्यास जोडावे.याबाबतील उपमहापौर संजय घाडी यांचे सोबत व महानगर पालिकेसोबत पत्र व्यवहार झाला असून तरी आम्हा स्थानिकांचे म्हणणे ऐकले जात नाहीय, त्यामुळे आज महिलांना आक्रमक व्हावे लागले, यामागे कोणाला तरी वाचवून कोणाचे तरी खिसे भरन्यासाठी हे होतेय असे जाणवत आहे.यावेळी विभागातील पूनम शिंदे,जया रेड्डी,निकिता सोनवणे,श्रद्धा मोरे,सुनीता सोनवणे, सुरेखा अलमवर,नंदा तलवटकर,बिस्मिल्लाह शेख,खैरुन्निसा शेख,शरीफा शेख, मालन शेख,मेघना ठक्कर,शाहीन शेख,लता कोंडेरू,जयकुमार नाडर, पटेल, रफिक शेख,नूर शेख यांच्या सह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
प्रमोद शिंदे- ८७९३२१३७३६ यांस कडून

