पारवे आणि जावळे परिवाराचा मंगल परिणय प्रसंगी नवा आदर्श पुस्तकं रुपी भेट.

बातमी शेअर करा.

दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मी कवयित्री आम्रपाली पारवे आणि ऋषिकेश जावळे यांचा मंगल परिणय घडून आला तरी,खर पाहायला गेलं तर आपण नेहमी पाहतो लग्न म्हटलं की अफाट खर्च,सोने नाणे, खरेदी,भांडी,पैशाची मोठी उलाढाल होत असते,तशी आमच्याही लग्नात झाली,परंतु आम्ही दोघे ही उच्चशिक्षित असल्यामुळे आम्ही थोडासा वेगळा विचार समजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे “बुद्ध तुकोबा शिव शाहू फुले आंबेडकर” यांचा विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जावा.लग्नात आलेल्या प्रत्येक प्रतिष्ठित,आदरणीय,गुरुवर्य,आप्तेष्ट, नातेवाईक मंडळींना साडी,चोळी,कपडे इ वस्तू आहेर म्हणून न देता पुस्तके ही भेट दिली,सत्कार समारंभात नारळ,शाल आणि पुष्पगुच्छ न देता पुस्तक देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला.

त्या पुस्तकात मध्ये आम्ही गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले,शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले,जातीव्यवस्थेचे निर्मूलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे,देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे प्रबोधनकार ठाकरे,दगलबाज शिवजी प्रबोधनकार ठाकरे, अशी समाजाच्या उपयुक्त असणारी 500 पेक्षा अधिक पुस्तके भेट म्हणून दिली.ही पुस्तके 11 एप्रिल 2026 रोजी मंगल परिणय प्रसंगी कन्हैया लॉन्स मांजरसुंबा या ठिकाणी तसेच 14 एप्रिल 2026 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वैद्यकीन्ही या ठिकाणी तसेच 17 एप्रिल 2026 रोजी मोठा भाव धनराज पारवे यांच्या जन्मदिनानिमित्त अनुसूचित नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा पाटोदा या ठिकाणी ही सर्व पुस्तके आणि खाऊ वाटप केला.पुस्तके सदिच्छा भेट म्हणून देण्याचं कारण असं आहे की पुस्तके वाचली पाहिजेत जो वाचेल त्याच मस्तक सुधारेल आणि हे सुधारलेल मस्तक कोणापुढे नतमस्तक होणार नाही.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” म्हणून आम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत पुस्तकाप्रती प्रेम जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे कारण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु जर कोण असेल तर ते आपण वाचलेली पुस्तके आहेत. हल्ली मोबाईल मध्ये आणि रील्समध्ये अडकून गेलेल्या माता भगिनी,बहीण भाऊ परत पुस्तकांशी बोलावेत म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.आम्ही जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आम्हाला इतिहास समजतो आणि आम्ही नवा इतिहास घडवू शकतो म्हणून वाचन गरजेच आहे आपण जर वाचले तरच या व्यवस्थेला आपण प्रश्न विचारू शकतो.आपल्या बुद्धीवर चढलेला गंज हा पुस्तक वाचल्यावर नक्कीच निघतो म्हणून वाचल पाहिजे.

बऱ्याचदा आम्ही पाहतोय आणि हल्ली तसे काही उदाहरण आपल्या समोर येत आहेत अंधश्रदेत कशा पद्धतीने लोक पुरुष महिला अडकून स्वतःच जीवन बरबाद करत आहेत म्हणून ही अंधश्रद्धा कुठेतरी थांबली पाहिजे जेव्हा लग्नाची तारीख ही शनिवारी येते अस समजल्यावर बऱ्याच लोकांचे मला कॉल आले मुहूर्त पाहिलाय का? शनिवारी लग्न येत आहे मग शनी वगेरे मागे लागतो अस बरंच काही!!! अशा भोगस रूढी ला दुजोरा न देत कुठला मुहूर्त न पाहता कुठल्या ही पंडिताकडे न जाता आम्ही एकाच गोष्टीवर ठाम राहिलो ते म्हणजे लग्नाची तारीख ही मुलींच्या शिक्षणाचे उद्धारक क्रतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच औचित्य साधून आम्ही 11 एप्रिल 2026 रोजी हा आमचा मंगल परिणय सोहळा अगदी आनंदात उत्साहात पार पाडला आणि समाजात एक नवीन आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केला.तरी अशा मोठ मोठ्या कार्यात तुमच्या माझ्यासारख्या तरुण तरुणीने अशा मोहिमा राबवणे मला योग्य वाटते, आपल्याला जमेल तेवढे आपण करण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आपण नक्की करू,आपण महामानव नाही होऊ शकत पण त्यांचे अनुयायी होण्याचा प्रयत्न करू हाच या मागचा हेतू आहे.तरी बुद्ध तुकोबा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेत जगताना जीवनसाथी ऋषिकेश जावळे यांची साथ लाभावी तरी त्यांना मंगल परिणयाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे,अशीच त्यांनी मला माझ्या सांसारिक आणि सामाजिक जीवनात साथ द्यावी हीच अपेक्षा
धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय

कवयित्री आम्रपाली पारवे ७०४५५२६९७४,बीड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *