
बरे देवा कुणबी केलों ।
नाहीं तरि दंभें असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया ।
नाचे तुका लागे पायां ॥२॥
विद्या असती कांहीं ।
तरी पडतों अपायीं ॥३॥
सेवा चुकतों संतांची ।
हेचि नागवण फुकाची ॥४॥
गर्व होता ताठा ।
जातों यमपंथें वाटा ॥५॥
तुका म्हणे थोरपणें ।
नरक होती अभिमानें ॥६॥
श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
बरे झाले देवा,तू मला कुणबी (शेतकरी) मध्ये जन्माला घातलेस,नाहीतर मी गर्वाने मेलो असतो.थोर केले नाहीस हे बारे झाले,आता मी तुझ्या पायाशी नाचू शकतो.माझ्याजवळ कोणतीही विद्या असती तर मला अहंकार झाला असता.त्या अहंकारामुळे माझ्या हातून संतसेवा घडली नसती आणि हा नरदेह वाया गेला असता.त्या विद्येच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व,ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो.माझे तुकोबाराय म्हणतात,थोरापणामुळे अभिमान,अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो.
बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा.
