सामाजिक बांधिलकीतून गरीब विद्यार्थिनीला IIT करिता आर्थिक मदत.

बातमी शेअर करा.

वर्धा (प्रतिनिधी) स्थानिक शिवनगर येथील व भाजीपाल्याच्या दुकानावर रोजंदारीने काम करणाऱ्या मजुराची मुलगी कुमारी संबोधी शंकर गोडघाटे हिने JEE परीक्षेत यश मिळवत कर्नाटक,धारवाड येथील आयआयआयटी महाविद्यालयात बी.टेक प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २३ ऑगस्ट होती,घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती तिच्या मार्गात अडसर ठरत होती.ही बाब आदर्श शिक्षक व स्वतंत्र समता शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष गौतम पाटील यांना समजल्यावर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू थुल,सुरेश वैद्य यांच्यासह संबोधीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षणाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक मदतीची गरज ओळखून, शिक्षक गौतम पाटील यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून समाजातील दानशूर नागरिकांना मदतीचे आवाहन केले.आणि अवघ्या तीन दिवसांत रुपये ६०,३०० इतकी रक्कम जमा झाली.त्यामुळे संबोधीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन तिच्या यशाबद्दल सत्कार करून गोळा झालेला निधी तिला प्रदान करण्यात आला.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गौतम पाटील सह राजू थुल,सुरेश वैद्य,सुनील ढाले,सुभाष गायकवाड,के.बी. थूल,महेंद्र बनसोड तसेच तिच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना जागरूक नागरिक घडवतात.शिवनगर येथील व भाजीपाल्याच्या दुकानावर रोजंदारीने काम करणाऱ्या मजुराची मुलगी संबोधी शंकर गोडघाटे हिने JEE परीक्षेत यश मिळवत कर्नाटक,धारवाड येथील आयआयआयटी महाविद्यालयात बी.टेक प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे.पण आर्थिक परिस्थिती पुढे कशी शिक्षण घेणार ही समस्या आई वडिलांची होती.पण एका शिक्षकाने सोशल मिडियाचा वापर करून संबोधीची आजची समस्या सोडविली पुढच्या शिक्षणासाठी आपण ही सढळ हस्ते फक्त शंभर,दोनशे,पांचशे रुपये कुमारी संबोधी शंकर गोडघाटे ९३२५१८६०१० हिच्या फोन पे नंबर वर पाठवून आई वडिलांची व संबोधीची आर्थिक अडचण दूर करू शकता.असे गौतम पाटील अध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघ यांनी आवाहन केले आहे.

गौतम पाटील ९४२३१२०४५९,वर्धा.

अध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *