
बहुजन समाजातील अनेक जण शासन-प्रशासनात मोठ्या पदावर जातात, पण पद मिळाल्यावर फक्त स्वतःचा बँक बॅलन्स वाढवण्यात रमून जातात. अशा गर्दीत डॉ. दयानंद इंगळे सर हे त्या नियमाला ठळक अपवाद आहेत.ते नोकरी करत नाहीत, तर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
भारती विद्यापीठ, नवी मुंबई इंजिनिअरिंग कॉलेजचे HOD म्हणून एका मोठ्या शैक्षणिक जबाबदारीवर असतानाही, त्यांनी कधीही स्वतःला फक्त प्राध्यापक म्हणून मर्यादित ठेवले नाही. त्यांच्या वडिलांनी भारत सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत प्रामाणिक सेवा केली, आईच्या शिस्तप्रिय संस्कारात आणि घरातच मिळालेल्या फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या बाळकडूवर त्यांचे व्यक्तिमत्व घडले.
शासनाच्या नामांकित वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण फुलले. तिथेच सामाजिक चळवळीत अग्रगण्य सहभाग घेत त्यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आत्मसात केले. आणि तेच कौशल्य घेऊन ते भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईसारख्या महाकाय शहरात बहुजन समाजाचा आधारस्तंभ बनले.आज मुंबईत -हायर एज्युकेशनला ऍडमिशन हवे असो,सर्व्हिस मधला प्रमोशनचा प्रश्न असो,सामाजिक अथवा कौटुंबिक अडचण असो…सर्वांसाठी हक्काचे आणि शेवटचे दार म्हणजे डॉ. इंगळे सर.
मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात बुलढाणा बौद्ध समाज मंडळाची स्थापना करून, अध्यक्ष म्हणून सर्व मुंबईकर बुलढाणेकर बहुजन बांधवांना त्यांनी एका प्लॅटफॉर्मवर आणले. अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक – सर्वांना एका माळेत गुंफून सामाजिक बांधिलकी त्यांनी जिवंत ठेवली आहे.आज मुंबईतील बहुजन समाजातील असा एकही अधिकारी नसेल की जो डॉ. इंगळे सरांना ओळखत नाही. याचे कारण आहे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व – उत्कृष्ट संघटन कौशल्य, गोड मधुर वाणी, संवादाची अद्भुत कला.
डॉक्टरेट मिळवूनही पाय जमिनीवर ठेवणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा, समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवणारा कार्यकर्ता म्हणजे डॉ. इंगळे सर.
डॉ. इंगळे सर हे फक्त व्यक्ती नाहीत, ते समाजाचा महामेरू आहेत.ते आमचे अभिमान आहेत – आमचे “बुलढाणा भूषण” आहेत.सर,आपल्या कार्याला आमचा मानाचा त्रिवार जयभीम! आपल्या नेतृत्वात काम करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विलास एस खरात 9224430613,पनवेल.



