बुद्धविहार हे धम्मक्रान्ती ची बीज निर्माण करणारी केंद्र आहेत.प्रा.डॉ.रेखा मेश्राम.    

बातमी शेअर करा.

छत्रपती संभाजीनगर — सारीपुत्त विपश्यना धम्म नाग सेवाभावी संस्था. संचलित तक्षशिला बुद्ध विहार, रामनगर एन 2 सिडको जालना रोड छत्रपति संभाजीनगर येथे दि. 20 ऑक्टोंबर 2026 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्य पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण उपासक राजकुमार लेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.विहारात तथागत भगवान बुद्ध यांना पुष्प अर्पण केली.प्रा. डॉ. रेखा मेश्राम बोलतांना म्हणाल्या की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिला त्याचे पालन केले पाहिजे.तो टिकवायला पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन केले पाहिजे.सम्राट अशोका नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी धम्मक्रांती केली आहे.धममदिक्षेचे सोहळे साजरे केले पाहिजे.मुलांना लहान असताना धम्मदीक्षा दिली पाहिजे.जुन्या व्यसणासोबत नव्या पिढीला नवी व्यसने येऊ लागली आहेत.त्यापासून सावध रहावे लागणार आहे.विषमता निर्माण होईल असे वर्तन करू नये.नव्या पिढीला संस्कार देणे खुप गरजेचे आहे.धम्मा च्या माध्यमातुन आपली कुटुंब मजबूत करणे गरजेचे आहे.कुटुंबाला समाजाला विभक्त करण्यापासून वाचवा.आंबेडकरी चळवळ मजबूत करणे गरजेचे आहे.बुद्धविहार हे नवसामाजाची केंद्र आहेत.महिलांनी अत्यंत सावध रहावे लागणार आहे.कारण व्यापारी धर्माच्या नावावर महिलांना फसवत आहेत.सणाच्या नावाखाली महिलांनी हुरळून जाऊ नये.काळ अत्यंत भयावह आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंदंत ईद्धी पण्यो हे अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले की महिलांनी आता पुढे आले पाहिजे. सम्राट अशोक राजा असताना कसा धम्माच्या वाटेवर आरूढ होऊन महान राजा होतो. धम्मामुळेच माणूस सुखी, आनंदी होऊ शकतो.  प्रमुख पाहुणे राजकुमार लेमाडे हे बोलतांना म्हणाले की झेन जी ला धम्म देण्याची आवश्यकता आहे.तरच हि पिढी योग्य मार्गाला लागेल.तरुण पिढी समोर समोर येतं आहे.नेतृत्व करत आहेत.ऍड बाळासाहेब आंबेडकर हे प्रतिक्रांती च्या विरोधात ठामपणे उभे आहेत.संविधान वाचवले पाहिजे.संविधानाला धोका निर्माण केला जात आहे.याप्रसंगी विहारातील उपसिका वैशाली गायकवाड, नंदा सातपुते, दिपाली शिनगारे, प्रज्ञा गायकवाड नावकर सर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षशिला बुद्धविहार चे अध्यक्ष आसाराम गायकवाड यांनी केले. याप्रसंगी विहाराचे सचिव अरविंद अवसरमोल, पदाधिकारी देविदास येवले, केशव गायकवाड, बाबासाहेब निकाळजे, भागवत वाघ, नावकर सर, भगवान बोरडे मिलिंद अवसरमोल, पुष्पा सुरडकर, मंगल साळवे, अनिता सोनवणे जमधडे आई, भास्कर साळवे साईनाथ दांडगे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचलन ऍड शरद जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद अवसरमोल यांनी मानले.

प्रा.भारत शिरसाट ९४२१३०८१०१ संभाजी नगर यांस कडून  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *