भांडुपच्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये एकसंघ संयुक्त जयंती महोत्सव

बातमी शेअर करा.

भांडुप मुंबई विशेष प्रतिनिधी -: मुंबईत अनेक ठिकाणी “माता रमाबाई आंबेडकर नगर” आंबेडकरी विचारांच्या रहिवाशांची वस्ती आहे.ती अनेक कारणाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.अशीच भांडुपच्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये एकसंघ संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाल्यामुळे चर्चेत आली आहे. सर्व गटाचे प्रमुख कार्यकर्ते नेते या वस्ती मध्ये राहतात. त्याचे कधी कोणत्याही बाबतीत एकमत होत नाही.अशावेळी आजचे सुशिक्षित तरुण रहिवाशी व कलावंत एकत्र आले त्यांनी भांडुपच्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये एकसंघ जयंती महोत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला. दिनांक दि १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महापुरुषांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याच्या  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.१४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता माता रमाबाई नगर येथून अशोक केदारे चौक इथ पर्यन्त विशाल मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली,त्यात नगरातील सर्व रहिवाशांनी दीड ते दोन हजार लोकांनी सहभाग नोंदवला.हि मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मिरवणुकीची सुरुवात आणि शेवट ही बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.यात महिलांचे लेझीम पथक विशेष आकर्षण ठरले होते. हॉस्पिटल परिसरातून मिरवणूक शांतपणे नेण्यात आली. त्यासाठी समितीचे विशेष कौतुक करण्यात आले. टेम्पो चालक-मालक संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे अशोक केदारे चौक येथे सर्वांसाठी भोजनाची तसेच विविध संघटनां मार्फत सरबत वाटप,पाणी वाटप आणि नाष्टा याची सोय करण्यात आली होती या सर्वांचे जयंती उत्सव समितीतर्फे आभार मानण्यात आले.
    तसेच जयंती निमित्त दिनांक २५ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात कार्यक्रमाचा शेवटपर्यंत प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिनांक २६ एप्रिल रोजी महिलांसाठी आणि मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याच बरोबर दि. २७ एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे तसेच २८ एप्रिल रोजी महिलांसाठी समुपदेशन शिबीर आशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि खिर दान हा कार्यक्रम घेण्यात आला. यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग नोंदवला.जयंती उत्सव समितीतर्फे सर्व देणगीदार, कार्यकर्ते,आजी-माजी सर्व सल्लागार,महिला आणि ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहभाग नोंदवला या सर्वांचे समितीतर्फे आभार मानण्यात आले.तसेच भांडुप पोलीस स्टेशन यांनी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.या प्रसंगी माता रमाबाई आंबेडकर महोत्सव समितीला जेष्ठ साहित्यिक पत्रकार सागर तायडे, कवी शाहीर साहित्यिक लक्ष्मण देठे.फुले,शाहू, आंबेडकर चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते प्राध्यापक जगन्नाथ बावा आणि परिसरातील जुने जाणते कार्यकर्ते मधुकर सोरटे,डी.वाय.एफ.आय संघटनेचे निष्टावंत ज्येष्ट कार्यकर्ते संदीप राजापूरकर यांनी शुभेच्छा दिल्या.भांडुप माता रमाबाई आबेडकर नगर एकसंघ जयंती महोत्सव समिती तर्फे अध्यक्ष- हर्षद मोदळे,सेक्रेटरी-रुपेश साखरे कवी गायक,खजिनदार-नितीन कदम,कार्यअध्यक्ष-राजेंद्र गायकवाड,उपाध्यक्ष-शिवराज कांबळे,उपसेक्रेटरी-विलास पारवे,उपखजिनदार-आदेश भांगे,तसेच समिती मधील सर्व सदस्यांनी आणि रहिवाशांनी उत्तम सहकार्य केले त्या बद्दल सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक केले जात आहे.

रुपेश साखरे ८१६९४५७६७६,कवी गायक,भांडुप यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *