
राजकुमार सिद्धार्थ ला इसवी सन 528 मध्ये ज्ञान प्राप्ती वैशाख पौर्णिमे ला झाल्या नंतर, ते बुद्ध झाले. बुद्ध झाल्यानंतर त्याना असलेले ज्ञान ते केवळ स्वतः साठी उपयोगात आणायचे या लोकांना सांगायचे ते लोकांना कळेल अथवा नाही अशी द्विधा अवस्था, मनस्थिती बुध्दाच्या मनात निर्माण झाली होती.तेव्हा त्याना वाटले की आपण ते इतरांपर्यंत पोहचविले पाहिजे पण पहिल्यांदा कोणाला सांगायचे तेव्हा बुद्धाला आलार कलामची आठवण झाली.पण त्याचे निधन झाले होते. पुढे त्याना त्याच्या सोबत असणाऱ्या पाच संन्यासीची आठवण झाली आणि मग ते सारनाथ ला त्याच्या शोधार्थ निघाले. त्या संन्याश्याना राग होताच त्यानी निश्चय केला की आपण बुध्दा चे स्वागत करायचे नाही. त्याना नमस्कार करायचे नाही, त्याचा सन्मान करायचा नाही असे त्यानी ठरविले पण बुद्ध जवळ,जवळ येताच त्यानी केलेला संकल्प तुटला आणि त्यानी बुध्दाचे स्वागत करून,सन्मान केला, पाणी दिले आणि आसन ही तयार केले. पुढे त्या पाच संन्याश्याना उपदेश बुध्दानी मानव कल्यानाचा केला व तिथेच धम्म आणि संघ उदयास आला.ते संन्याशी म्हणजे कौडीन्य,महानाम,अस्वजीत,वग्ग आणि भद्दीय यांना धम्म शालवृक्षाखाली सारनाथ या ठिकाणी समजावून सांगितला.
पुढे यशला धम्म दिक्षा दिली व अशाप्रकारे बुद्ध विचार वाढत पुढे जात होता.हा विचार वास्तव वादी मानवाच्या हिताचा असल्याने आणि बोली भाषेत लोकांना हा भिक्कू वर्ग समजावून सांगत असल्यामुळे लोकांना सहज कळला आणि लोक त्या दिशेने जायला लागले. त्याकाळी देवाला आपल्या बाजूला घेण्यासाठी यज्ञ, होम जे काही पूजा अर्चा होत होती. जनावराचा बळी त्या यज्ञात दिला जात होता. रात्रभर तो यज्ञ चालत राहात.त्यात महिला,पुरुष,नाचत,गात,मद्य, दारू सेवन करीत होते त्यामुळे जनावराच्या मोठया प्रमाणात कत्तली होत.हे चालत असत परंतु बुध्दाने केलेल्या बोली भाषेतील मानव कल्यानाच्या उपदेशामुळे त्या यज्ञ च्या प्रथेला आळा बसला आणि लोकांना खरं कळायला लागले.लोक चिकित्सक पणे विचार करू लागले. वैज्ञानिक दृष्टीकोण समजू लागले आणि पहाता, पहाता अनेक राजे देखील बुध्दाचे अनुयायी झाले.मग राजा बिंदूसार असेल या इतर कोणी,राजा जेव्हा जो मार्ग स्वीकारतो त्यावेळी प्रजा मात्र त्या मार्गांवर निश्चित पणे चालण्यासाठी कटीबद्द असते. हे मात्र तेवढेच खरे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधान मध्ये स्वातंत्र्य,समता,बंधूभाव आणि समान न्याय ही तत्व आपल्या संविधान मध्ये समाविष्ट केली त्याचाबरोबर जो कोणी समतेच्या विरोधात काम करेल,जो कोणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्या ला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करेल त्याला अटकाव करण्याचे प्रावधान देखील संविधान मध्ये करून ठेवले आहे या सर्व कारणामुळे आपल्या देशात अनेक धर्म,अनेक बोलीभाषा,अनेक जाती,अनेक पेहराव असतांना हा भारतीय समाजातील माणूस एकसंघ आपल्याला दिसतो.त्याच बरोबर संविधान मधील कलम 340 ओबीसी प्रवर्गा साठी आहे.कलम 341 एस सी,प्रवर्गासाठी आहे आणि कलम 342 एस टी प्रवर्गा साठी संविधान मध्ये दिल्या गेलेली आहे.म्हणजे आपल्या देशात असलेल्या अनेक जाती यांना एका सूत्रात बांधण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे.त्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाची सोडवणूक या माध्यमातून करण्याचा प्रयत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. आणि ओबीसी प्रवर्गा ला इतर मागासवर्गीय आणि एस सी प्रवर्गाला मागासवर्गीय प्रवर्ग म्हणून सदोदित एकसंघ राहतील असा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे.
बहुजन हिताय,बहुजन सुखाय हा बुद्धाचा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340,341,342 म्हणजे इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय यांच्या कल्यानाची तरतूद केलेली आहे. सोबतच संविधान मधील कलम 51 मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण कर्तव्या मध्ये सांगून बुद्ध विचार सतत लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन आणि स्वतः बावीस प्रतिज्ञा घेऊन,करून त्या बुद्ध विचाराशी कटीबद्द राहण्याचा संकल्प, निर्धार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे.सोबतच नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 ला पाच लाख लोकांना धम्म दिक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर या ठिकाणी तीन लाख लोकांना धम्म दिक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकवीस व्या प्रतिज्ञात असे म्हणतात आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो आणि बावीस व्या प्रतिज्ञा त म्हणतात मी बुध्दाच्या शिकवणी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतात.त्यामुळे त्याची बुद्ध विचार धारेशी पक्की निष्ठा आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारा माणूस, विचारावर निष्ठा असणारा माणूस, स्वाभिमानी माणूस,बुद्ध विचार धारेच्या दिशेने जाण्यासाठी ध्येय गाठ बांधून काम करायला लागला तर बुद्ध विचार संपूर्ण भारतीय लोकांपर्यंत सहज पोहचेल. त्यामुळे एक बौध्द म्हणून आपली ती प्रतिबद्धता असली पाहिजे.तर भारत बुद्धमय होईल. म्हणजे समता,बंधूभाव,समान न्याय सर्वांना मिळेल आणि आपल्या देशाचे स्वातंत्र्य चिरकाल कायम राहील. “बुद्ध अनुयायी नेमका कोण?.” हा प्रश्न कोणीही विचारनार नाही. त्यासाठी बौद्धानी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला पाहिजे. त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे तो खरा बौध्द अनुयायी होय.”
अविनाश टिपले- 9970917389,चंद्रपूर.

