उत्तम अंभोरे,भीमराव सरवदे,राजेंद्र गोणारकर,कोंडबा हाटकर यांना राजरत्न उत्कृष्ट वांडमय पुरस्कार जाहीर.

बातमी शेअर करा.

छत्रपती संभाजी नगर : साहित्य हा समाज मनाचा आरसा असून समाजात प्रतित होणारे चित्र साहित्यात प्रतिबिंबित होत असते. समाज मनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य साहित्यीक करित असतात.या उदात्त हेतूने गेल्या सात वर्षांपासून रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती व बोधीपर्ण प्रकाशन,छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२४-२५ या वर्षाचा साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा “राजरत्न उत्कृष्ट वांडमय पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ.उत्तम अंभोरे, भीमराव सरवदे,डॉ.राजेंद्र गोणारकर आणि डॉ.कोंडबा हाटकर यांना जाहीर करण्यात आले आहे.डॉ.उत्तम अंभोरे हे आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात कवी लेखक असून त्यांच्या “अस्मितेच्या नव्या वाटा” या समीक्षा ग्रंथाला देण्यात आला आहे.तसेच फुले, शाहू,आंबेडकर आणि पेरियार रामस्वामी नायकर यांच्या चळवळीचे अभ्यासक तथा प्रख्यात विचारवंत,अनुवादक भीमराव सरवदे यांच्या “आंबेडकरी चिंतन” या वैचारिक ग्रंथाला मिळाला असून नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील प्रख्यात कवी विचारवंत डॉ.राजेंद्र गोणारकर यांच्या “नवी लिपी” या काव्यसंग्रहाला देण्यात आला आहे.तसेच नव्या पिढीतील नवी मांडणी करणारे समीक्षक लेखक डॉ.कोंडबा हाटकर यांच्या “बेदखल” या कादंबरीला देण्यात आला आहे. हे पुरस्कार फुले,शाहू,आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी व समाजात समता न्याय स्वतंत्र आणि बंधुभाव एकात्मता निर्माण करण्यासाठी लेखन करणाऱ्या साहित्यिकांना दिला जातो.त्यांच्या कार्याची नोंद म्हणून तथा लेखकांना त्यांच्या कार्यात अधिक प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार दिला जातो.या साठी कोणाकडूनही आवेदनपत्रे अर्ज वा विनंती अर्ज न घेता सामाजिक साहित्यिक क्षेत्रात काम करित असलेल्या व व्यापक जनसंपर्क असलेल्या व्यक्ती कडून नावे आमंत्रित केले जातात.या मधूनच राजरत्न उत्कृष्ट वांडमय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.लवकरच हे पुरस्कार रमाई धम्मसृष्टी स्मारक समितीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रमाई बौध्द धम्मसंगिती मध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन प्रदान करण्यात येतील असे प्रख्यात कवी तथा समीक्षक देवानंद पवार यांनी कळविले आहे.

देवानंद पवार 9158359628,संभाजी नगर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *