राष्ट्रपिता ते राष्ट्रीय नेता अभियान अंतर्गत भटक्या विमुक्त समाजांच्या एकूण १४७ कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी अहमदपूर – राष्ट्रपिता ते राष्ट्रीय नेता अभियान अंतर्गत भटक्या विमुक्त समाजांना नागरिकत्वाचे, जातीचे दाखले,रहिवासीचे, उत्पन्नाचे आधार कार्ड राशन कार्ड जन्म नोंदणी दाखले एकूण १४७ कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर,नायब तहसीलदार अभिनव जगताप सर, नायब तहसीलदार शितल स्वामी, मंडळ अधिकारी वैशालीताई सूर्यवंशी,मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर,मंडळ अधिकारी भंडारी सर, मंडळाधिकारी विशाल कंचे सर, जिजामाता सेवाभावी संस्था अध्यक्ष अण्णाराव सूर्यवंशी संस्थेचे कार्यकर्ते शीला शिंदे, रूपाली विकास राठोड, भटके विमुक्त्या समाजातील कैकाडी वडार, मसनजोगी, घिसाडी, शिकलकर, पारधी, बुरगुर पश्चिम, कडकलक्ष्मी, तांबटकर इत्यादी समाजातील १४७ कुटुंबतील प्रमख लोकांची उपस्थिती होती. त्यांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 

    नायब तहसीलदार हा तालुका पातळीवरील एक महत्त्वाचा महसूल अधिकारी असतो, जो महाराष्ट्र शासनात गट-ब (वर्ग-२) राजपत्रित (Gazetted) अधिकारी म्हणून काम पाहतो. मुख्य जबाबदाऱ्या आणि कामे महसूल व जमीन रेकॉर्ड: जमीन महसूल गोळा करणे, ७/१२ व फेरफार नोंदींची पाहणी करणे.प्रशासन: तहसीलदारांच्या अनुपस्थितीत संपूर्ण तहसील कार्यालयाचा कारभार व प्रशासन सांभाळणे.दाखले व प्रमाणपत्रे: नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाचे शासकीय दाखले देणे.निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन: निवडणुकांचे कामकाज पार पाडणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे.अर्धन्यायिक कार्य: शेती व जमिनीशी संबंधित महसुली वादांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे.नायब तहसीलदार हे गट-‘ब’ (वर्ग-२) मधील ‘राजपत्रित’ (gazetted) पद आहे. तहसीलदार यांना असलेले जवळपास सर्व अधिकार व कर्तव्य नायब तहसीलदारांना लागू होतात.महसूल विभागाच्या कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम बघतो.जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे काम नायब तहसीलदार करतो.
     कमी तिथे आम्ही या वाक्याप्रमाणे नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो.अशा पदावर असलेले व्यक्तीने सामाजिक बांधिलकी ठेवून कर्तव्यदक्ष पणे काम केल्यास सर्व असंघटीत मागासवर्गीय भटक्या विमुक्त्या समाजाच्या लोकांना अनेक प्रकारचा न्याय मिळू शकतो.ज्या लोकांना तह्शीलदार नायब तह्शीलदार कोण असतात.त्यांची कामे काय असतात.अशा लोकांना सत्यशोधक चळवळीतील अण्णाराव सूर्यवंशी हे मराठवाड्यातील भटक्या विमुक्त्या  समाजाच्या लोकांना माहिती देऊन नागरिकत्वाचे,जातीचे,रहिवासीचे, उत्पन्नाचे,आधार कार्ड, रेशन कार्ड,जन्म नोंदणी,मृत्यू दाखले काढून देण्याचे काम प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष करीत आहेत.राष्ट्रपिता ते राष्ट्रीय नेता अभियान अंतर्गत भटक्या विमुक्त समाजांना नागरिकत्वाचे पुरावे म्हणून जातीचे,रहिवासीचे,उत्पन्नाचे आधार कार्ड,रेशनकार्ड, जन्म नोंदणी असे एकूण १४७ कुटुंबांना तह्शीलदार नायब तह्शीलदार मंडळ अधिकारी या मान्यवरांच्या हस्ते दाखल्याचे वाटप करण्यात आले.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *