
विशेष प्रतिनिधी- मुंबई – रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच, ‘स्वतंत्र मध्य रेल्वे कर्मचारी युनियन’चे अध्यक्ष श्री. सुरेश भालेराव साहेब आणि सरचिटणीस श्री. संतोष कडाळे जी यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी आजवर इतर कोणत्याही मान्यता नसलेल्या (नॉन-निगोशिएटिंग) कामगार संघटनेला जमली नाही. ‘स्वतंत्र मध्य रेल्वे कर्मचारी युनियन’साठी हा एक मोठा विजय आहे. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी गोरखपूर येथे होणाऱ्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (AGM) युनियनने थर्ड एसी (3rd AC) कोच यशस्वीरित्या आरक्षित (बुक) केला आहे. ही बातमी मध्य रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर ‘स्वतंत्र मध्य रेल्वे कर्मचारी युनियन’ची ओळख आणि प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल.असे विकास गौर,राष्ट्रीय सरचिटणीस,SRBKU / स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन (संलग्न – सेंट्रल ट्रेड युनियन – इंडिपेंडंट लेबर युनियन) यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२/१३ फेब्रुवारी १९३८ ला रेल्वे गँगमन कामगारांच्या दोन दिवशीय परिषद मध्ये मागासवर्गीय कामगारांना स्वताच्या विचारधारेची संघटना स्थापन करून कामगारांच्या समस्या सोडविण्याचा संदेश दिला होता. तेव्हा त्यांनी कामगारांचे दोन शत्रू एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही हे कायम लक्षात ठेवण्याचे आवाहन केले होते. आज रेल्वे मध्ये मागासवर्गीय कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना कायमस्वरूपी काम मिळाले पाहिजे. त्या जागी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार भरती केली जात आहे. या विरोधात राष्ट्रीय ट्रेड युनियन आवाज उचलतांना दिसत नाही. ते काम येत्या काळात ‘स्वतंत्र मध्य रेल्वे कर्मचारी युनियन’ संलग्न :- सेंट्रल ट्रेड युनियन – इंडिपेंडंट लेबर युनियन (आय एल यू.) करणार आहे.असे विकास गौर,राष्ट्रीय सरचिटणीस,(SRBKU) यांनी सांगितले.
सागर तायडे यांस कडून

