
श्रीरामपूर (प्रतिनिधी) समाजातील वंचित शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा सन्मान नेहमीच केला जातो.हरेगाव या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी मोठी धम्म परिषद घेतली होती,याच ऐतिहासिक घटनेची जाणीव जपण्याचे कार्य भारतीय बौद्ध महासभा व भिमराव आंबेडकर यांच्या वतीने केले जाते.या वर्षी समाजातील विविध संघटना व समाजसेवक यांच्या कार्याला प्रोत्साहान देण्यासाठी समाजभूषन पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यात ज्येष्ठ.नेते सुधकर रोहम,समाज सेवक शांताराम देठे, प्रा.अजय पवार,कुंडलिक लांडगे,आदिंचा समावेश होता.स्वाभिमानी धम्म परिषद उत्सहात पार पडली.धम्म उपासक उपसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली,उत्तम प्रतिसाद दिला.शेवटी सरनते घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिकशांताराम देठे यांना धम्मरत्न पुरस्कार.
आयुष्य.शांताराम देठे गुरुजी माझी श्रामणेर बौद्धाचार्य आंबेगाव तालुका यांना धम्मरत्न पुरस्कार मिळाले बद्दल भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्याच्या वतीने खूप खूप अभिनंदन.
गुरुजींचा परिचय द्यायचा म्हटले तर ते आपल्या शाखेच्या 2022 च्या शिबिरात सहभागी होते.त्यांनी श्रामणेर झाल्यावर आपल्या शाखेला समता सैनिक दल साठी असणारे 10 ड्रेससाठीचे कापड शाखेला दान दिले होते. अश्या दानदात्यामुळे आपल्या शाखेला धम्मरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व आयुष्य.शांताराम देठे गुरुजी यांना अनेक पुरस्कार मिळाल्या बद्दल शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.आपल्या शाखेत शिक्षण घेऊन जर कोणी चांगले लक्षवेधी प्रेरणादायी काम करत असेल तर त्या शाखेला त्यांचा अभिमान वाटणे सहाजिकच आहे. आज जो आयुष्य.शांताराम देठे गुरुजी यांना पुरस्कार मिळाला त्याचे मुळे आपल्या शाखेचे नाव पण मोठे झाले आहे.गुरुजींचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.आयुष्य.शांताराम देठे गुरुजीचे सर्व धम्म उपासक उपासिका यांनी हार्दिक अभिनंदन.
महाराष्ट्रात दलित पॅथर पासून समाजासाठी समता प्रस्तापित करणारे भीम सैनिक व समता सैनिक दलाचे कमांडर शांताराम देठे यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.दलित पँथर स्थापने पासून पद्मश्री नामदेव ढसाळ व शहिद क्रांतीकारक नेते भाई संगारे यांच्या सोबत एक सच्चा भिम सैनिकाची निस्वार्थ जबाबदारी पार पाडली.महाराष्ट्रातील अन्याय अत्याचारा विरोधात दंड थोपटून छातीची ढाल पुढे करणारा एकमेव भिम सैनिक अशी ख्याती असणारा लढवय्या कधीही प्रसिद्धी च्या झोतात राहिला नाही.उतरत्या वयातही तरुणांना प्रेरणादायी विचार पेरण्याचे कार्य आजही घडत आहे. स्वतःवर अनेक संकटे कोसळी पण चळवळीची नाळ कधीही तुटू दिली नाही.त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रातील समतावादीना घ्यावीच लागेल.ग्रामीण भागात समता सैनिक दलाच्या अनेक शाखा त्यांनी सुरू केल्या त्यांच्या कार्याची दखल तमाम आंबेडकर जनतेने घेतली व त्यांनाच हा पुरस्कार दिला त्यांच्या या पुरस्काराबद्दल विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श समिती तसेच धम्मयात्रा कमिटी,लोक परिवर्तन पत्रकार संघ,शहिद भाई संगारे प्रतिष्ठान अशा अनेक संघटनेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.बहुजनांचा आवाज चॅनल,सोशल मीडियातील संघटनेने त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी जनता त्यांची ऋणी आहे. अशीच समाजास प्रेरणादायी कार्य त्यांच्या हातून घडत राहतील असा आशावाद धम्म बांधवांकडून केला जात आहे.
जय भीम.
