
पंचशील नगर घाटकोपर – आज माझे परममित्र,मोठे बंधू आदरणीय आयुष्यमान शांताराम शंकर देठे यांचा वाढदिवस आणि आदरणीय लक्ष्मी शांताराम देठे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस! त्यानिमित्त त्यांना सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा मिळत असताना एक वास्तववादी हे कुटुंब कशा पद्धतीने या मुंबई नगरीत आंबेडकरी चळवळीशी नाते जोडून गेली तीस वर्ष समाजाला विविध माध्यमांतून योगदान देत आहे त्या विषयक त्यांच्यावर लिहण्याचा मोह आवरता आला नाही.
आयु.एस.एस. देठे यांचा माझा परिचय ३०/३५ वर्षांपासूनचा.कार्यकर्ता,समाजसेवक,भीमसैनिक, बौद्धाचार्य,SSD सैनिक ते SSD चे चिफ कमांडर,विशेष म्हणजे सर्व धर्मीय वधु वर सूचक (SDP) संस्थेचे कार्यवाहक,माझ्या दृष्टिपथातील त्यांच्या सहकार्याने ते राहत असलेल्या विभागातील अनेक मंडळांचे ते मार्गदर्शक सल्लागार असुन त्यापैकी वंदे मातरम् मित्र मंडळ,पंचशील बुद्ध विहार निर्मितीत त्यांचा अग्रस्थानी सहभाग असुन ते त्याचे आजही विश्वस्त आहेत.ऐन उमेदीत ते एका प्रतिशयीत कंपनीत काम करत असताना त्यांनी एक रिक्षाचालक म्हणूनही काम केले. घाटकोपर मुंबईबेस्ट बॉम्सफोट प्रकरणात ते जबर जखमी होऊन आपली श्रवण यंत्रणा गमावून बसले. त्यावेळेच्या शासनाने तुटपुंज्या प्रमाणात मदत केली. आज ते उतार वयात असुन पत्नी लक्ष्मी याही शारीरिक दृष्ट्या सलामत नसल्याने,त्याचबरोबर त्यांना कर्ता मुलगा नसलेने त्यांच्या कुटुंबाचे उदरभरण होण्यास बिकट आहे. मात्र त्यांची माहेरवाशीण मुलगी सुनीता आपल्या परीने त्यांचे संगोपन करत आहे. समाजातून त्यांना सन्मानाने मदत करण्या कामी तुमच्या माझ्यासारखी मंडळी करत असताना या स्वाभिमानी माणसाचा ऊर भरून येतो. तर ज्यांना त्यांनी मोठे केले अशी मंडळी आज गब्बर असुन त्यांच्यापासून दुर राहतात याचे त्यांना शल्य होते.
रिडालोस च्या माध्यमातून या पट्ट्याने मनपाची सार्वत्रिक निवडणूकही लढवली मात्र त्यात त्यांना अपयश आले. त्यांनी खचून न जाता आजहीआपले कार्य सुरू ठेवले आहे.आदरणीय रामदास आठवले,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर,मा.महादेव जानकर अशा महानियांच्या पाठीमागे ते बोदिगार्दप्रमाणे उभे राहत असायचे मुळातच ते चॅम्पियन होते.आज ते आपल्या स्थानिक धम्मबंधू सोबत विहारात धम्मवर्ग चालवतात,विविध माध्यमांतून विद्यार्थी वर्गाला साहित्य मदत देतात,समाजाचे लहानसहान प्रश्न सोडवतात मात्र आजच्या पडत्या वृद्धापकाळात त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यास कोणी पुढे येत नाही हे स्पष्ट जाणवते.मला मानसपुत्र मानल्याने माझ्यावर फार हक्क दाखवतात वेळप्रसंगी लहान मुलाप्रमाणे रुसुन बसतात, मात्र माझीही आर्थिक स्थिती बेताची असल्याने समजुन घेतात.आज त्यांच्या जवळचे कोण असेल तर मा.आनंद वैराळ,आणि काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत.त्यांचा धम्मावरचा अगाध विश्वास असुन ते आजही जीवनाचा संघर्ष करत असताना दिसतात त्यांच्या कार्याला सलाम! क्रांतिकारी जय भिम!!
आज त्यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने आणि लग्न वाढ दिवसाच्या निमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा देत असताना मी समाजाला आवाहन करतो की, आपण आयुष्यमान शांताराम शंकर देठे ८८७९७८८६०९ यांच्या समता सैनिक दल व धम्म कार्याची दखल घेऊन त्यांच्या उर्वरित आयुष्याला चालना देऊन एक मैत्री भावना निर्माण करण्यासाठी मंगल कामना करावी.
धन्यवाद!!!
आपला स्नेहांकित,
बौद्धचार्य:आयु. संजय पारडे (पत्रकार), मुंबई.
