
कल्याण प्रतिनिधी :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि) कल्याण या संस्थेची २० वी वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा दि २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०३.०० वाजता स्थळ चौधरी पाडा शत्रूघन कारभारी यांचे फार्म हाऊस बापगाव या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांच्या अध्यक्षते खाली आणि माजी महापौर संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली.
आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थित ही विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली.यावेळी सन २०२५ या वर्षासाठी जयंती समिती,प्रकाशन समिती, शिक्षण समिती,आणि आरोग्य समितीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जयंती समितीचे अध्यक्षपदी संतोष हेरोडे सचिव पदी नवनीत गायकवाड तर खजिनदारपदी युवराज गाडे यांची निवड करण्यात आली. प्रकाशन समितीच्या अध्यक्षपदी सुनील चाटे,तर सचिव पदी संदीप गिरी आणि खजिनदारपदी उत्तम साबळे यांची निवड करण्यात आली.शिक्षण समिती अध्यक्षपदी समाधान मोरे तर सचिव पदी प्रवीण कांबळे आणि खजिनदारपदी संजय ओंकारेश्वर यांची निवड करण्यात आली. तसेच आरोग्य समितीसाठी हरिश्चंद्र जाधव,लक्ष्मण मोते आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांची निवड करण्यात आली.
तसेच पत्रकार प्रतिनिधी म्हणून राजू काऊतकर,विलास भोईर,आणि अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून बहुजन उद्धारक राष्ट्रीय महापुरुष आणि राष्ट्रीय महामाता यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्ताने विविध प्रकारचे भरगच्च कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात.या राष्ट्रीय महापुरुषांच्या विचाराचा वारसा जपत स्तुत्य उपक्रम हाती घेऊन विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात त्याच बरोबर सन २०२४-२५ मध्ये सुद्धा परिवर्तनशील आणि समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे मत जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे यांनी व्यक्त केले.