महामानवांची महामाता भिमाई यांची १७२ वा जयंती महोत्सव आंबेटेंबे येथे 14 फेब्रुवारी 2026 रोजी.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी – भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) म्हणजेच भीमाबाई रामजी आंबेडकर,यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 रोजी आंबेटेंभे या ठिकाणी झाला होता.त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा पंडित हे आंबेटेंभे या गावचे होते,भिमाई भूमी सामाजिक संस्था (रजि) आंबेटेंबे,मुरबाड तालुक्याच्या वतीने भिमाईची जन्मभूमी आंबेटेंबे,तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे,येथे दरवर्षी मोठ्या उत्सवाहात भिमाई जयंती साजरी केली जाते.माता भिमाई च्या १७२ व्या जयंती महोत्सवात आंबेटेंबे येथे 14 फेब्रुवारी 2026 रोजी.प्रमुख पाहुणे मान.आयु.आनंदराज आंबेडकर साहेब सभापती बौद्धजन पंचायत समिति,राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आयु.शिवरामजी धनगर मा.श्रामणेर,स्वागताध्यक्ष मा.आयु.भाऊसाहेब रातांबे अध्यक्ष भिमाई भूमी सामाजिक संस्था,मा.आयु.गुरुनाथ पवार सरचिटणीस भिमाई भूमी सामाजिक संस्था,हे असतील तर सूत्र संचालन मा.आयु.प्रकाश गायकवाड,गौतम दाजी रातांबे करतील.त्याच बरोबर भिवंडी लोकसभा खासदार मान.सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे,स्थानिक मुरबाड विधानसभा आमदार मान.किसनजी काथोरे,मान.कपिलजी पाटील माजी मंत्री पंचायत राज,मान.आयु.प्रा.मुकुंद भारसाकळे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहूउद्देशीय प्रतिष्ठान अकोला,मान. आयु.भगवान भालेराव उपमहापैर उल्हासनगर,मान.आयु.राजकुमार वंजारी अध्यक्ष श्री.भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर,मान.आयु.लक्ष्मण भगत कार्याध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती,मान.आयु.राजेश घाडगे सरचिटणीस बौद्धजन पंचायत समिती,मान.आयु.धनाजी सुरोशे अध्यक्ष ओबीसी पॅथर,मान.आयु. समाधान इंगळे साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे,मान.आयु.अनिल लाड साहेब उपविभागीय पोलिस अधीक्षक मुरबाड,मान.आयु.लता गायकवाड मॅडम गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड,मान.आयु.गौतम मोर साहेब अध्यक्ष बहुजन धम्म मिशन मुंबई, मान.आयु.अभिजीत देशमुख साहेब तहशिलदार मुरबाड,  मान.आयु.बाळाराम गायकवाड साहेब सचिव महाराष्ट्र राज्य रिपाई,मान.आयु.संजय गायकवाड साहेब अध्यक्ष रिपाई ठाणे जिल्हा,मान.आयु.तेजस जाधव साहेब युवक अध्यक्ष रिपाई ठाणे,मान.आयु.दादासाहेब एडके साहेब वारिष्ट पोलिस निरीक्षक मुरबाड,  मान.आयु.उल्हासभाऊ बांगर साहेब मा,सदस्य जिल्हा परिषद ठाणे, मान. आयु.प्रथमेश सावंत साहेब संस्थापक अध्यक्ष जाणीव सा.सं महा राज्य, मान.आयु. संजय कोरडे साहेब उपअभियंता सार्व बां विभाग मुरबाड,मान.आयु.राजेंद्र निकाळजे साहेब अध्यक्ष धम्म राजिका महाविहार परांडा,मान.आयु.राजेंद्र ससाणे साहेब अध्यक्ष बोधीवृक्ष फाउंडेशन महा राज्य,मान.आयु.अनिल धनगर साहेबकार्याध्यक्ष रिपाई ठाणे, मान.आयु.शरदचंद्र सोनावणे साहेब सरचिटणीस रिपाई ठाणे, मान.आयु. शुद्धोधन जाधव साहेब उपसरपंच दोहोळे-भिवंडी,मान.आयु.महेंद्र गोविंद भोईर साहेब मा.सहाय्यक आयुक्त ठाणे महानगर पालिका, मान.आयु.प्रविण नागवंशी साहेब संस्थापक अध्यक्ष लुंबिनी सा.सं.महा राज्य,मान.आयु.प्रियांकाताई चौधरी सरपंच ग्रामपंचायत आंबेटेंबे,मान.आयु.मेधाताई चौधरी पोलिस पाटील आंबेटेंबे,मान.आयु. संतोष उबाळे साहेब ग्रामपंचायत अधिकारी आंबेटेंबे,आदि मान्यवर उपस्थित राहतील. 

महामानवांची महामाता भिमाई यांची १७२ वा जयंती महोत्सव आंबेटेंबे येथे 14 फेब्रुवारी 2026 रोजी.सकाळी १० वाजता धम्म ध्वजा रोहन व प्रतिमा पूजनाने सुरवात होईल,सामाजिक प्रबोधनाचा संगीतमय कार्यकम,प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन झाल्यावर उपस्थित धम्म बांधवांना भोजनदान असेल.ठाणे मुंबईतील सामाजिक संस्था,शाखा,मंडळे सर्व धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने आपल्या परिवारासह सहभागी व्हावे असे आवाहन मा.आयु.भाऊसाहेब रातांबे ९२७२६९९८८४ अध्यक्ष भिमाई भूमी सामाजिक संस्था,यांनी केले आहे.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *