बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

बातमी शेअर करा.

प्रमुख मार्गदर्शक यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी अनेक कार्यक्रम असतानाही महापौर दोन तास थांबले.

समाजातील जेष्ठ कार्यकर्ते जाधव बंधू यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता

शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव संस्था,वसई आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था नालासोपारा यांच्या वतीने ७-८ फेब्रुवारी रोजी तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये वीरमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीमाई आणि त्यागमाता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव अतिशय उत्साहात आणि प्रचंड मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ७ तारखेला विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये वक्तृत्व, चित्रकला, नृत्य आणि वेशभूषा अशा अनेक स्पर्धा होत्या त्यामध्ये वसई तालुक्यातील सर्व वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला आणि आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांचा मोठा आविष्कार दर्शविला विशेष म्हणजे रांगोळी प्रदर्शन अतिशय मोहित करणारे होते.रविवारी ८ तारखेला मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक आदरणीय जेष्ठ साहित्यिका आशालताताई कांबळे आणि जेष्ठ नाट्य-सिनेअभिनेत्री चिन्मयी सुमीत यांना निमंत्रित करण्यात आले होते,दोघींचे ही मार्गदर्शन इतके अभ्यासपूर्ण, उत्तम मांडणी करणारे होते की आदरणीय महापौर अजीवजी पाटील हे इतर कार्यक्रम बाजूला ठेवून तब्बल दोन तास थांबले होते.नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांचा शाल,पुष्प आणि रमाई पुस्तक देऊन सन्मानीत करण्यात आले शिवाय अनेक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते त्यांनाही सन्मानित करण्यात आले.

   सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना अनेक उत्तम नृत्य व स्वागतासाठी विशेष तयारी केलेले लेझीम नृत्य मुख्य आकर्षण ठरले होते.सर्व स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आणि वेशभूषा स्पर्धेत विजेत्यांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात केले गेले.विशेष म्हणजे या कार्यक्रमाची तयारी तीन महिन्यांपासून सुरू होती त्यावेळी अध्यक्ष रुपेशदादा जाधव व चिटणीस नरेश जाधव यांनी अभिवचन दिले होते की हा कार्यक्रम अतिशय सुंदर व दैदीप्यमान होणार परंतु नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये थोड्याशा फरकाने पराभव पत्करावा लागला तरीही समाजाला दिलेल्या वचनापासून ते दुर झाले नाहीत खरं तर ते समाजासाठी आजही विजेतेच आहेत आणि विजेतेच राहाणारे हे निर्विवाद सत्य आहे. 

    या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रुपेश जाधव,चिटणीस नरेश जाधव,कार्याध्यक्ष किशोर काकडे,खजिनदार नगरसेवक ऍड.प्रसन्ना भाताणकर,हरीश गायकवाड,प्रकाश जाधव सर आणि संजयकुमार खैरे यांनी अथक परिश्रम व नियोजन केले.विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महिलांनी अतिशय उत्तम केले त्यामध्ये सुगंधा कलमकर,दर्शना पवार आणि सृष्टी भाताणकर यांचा मोठा सहभाग होता.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बौध्दजन पंचायत समिती शाखा,सुप्पारक धम्म सेवा संघ, तथास्तु ग्रुप,भारतीय बौध्द महासभा, आंबेडकरी स्त्री संघटना,के के युथ असोसिएशन व बुध्दस्तूप सेवा संघ यांचे विशेष सहकार्य लाभले.परिक्षक म्हणून प्रा.संध्याताई वैद्य,प्रा.गौतम मोरे,प्रकाश जाधव सर,कुंदन जाधव,अभिजित खैरे व आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमोल गायकवाड यांचे योगदान लाभले.शेवटी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.

संजयकुमार खैरे ९८३३५७९८९९,नालासोपारा, 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *