बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) पाषणातील झऱ्याला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी बांद्रा मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागाचा उपदेश आणि “शिका,संघटित व्हा,संघर्ष करा” असा मौलिक विचार अनुसरून मोक्याचा जागा तहसीलदार,उपजिल्हाधिकारी आणि शेवटी जिल्हाधिकारी अशा प्रशासनातील सर्वोच्च पदावर राहून देखील निष्कलंक प्रशासन तथा उत्कृष्टतेने त्यातून समाजसेवा करणाऱ्या बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) म्हणजे वसंत लक्ष्मण गवई  यांना आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे केंद्र स्थान प्रेरणा स्थान आंबेडकर भवन दादर मुंबई येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील भूमिपुत्राचे बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी समाज मंडळ मुंबई च्यावतीने जीवन गौरव पुरस्कार सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे रक्ताचे वारसदार रिपब्लिकन सेना सरसेनापती आनंदराज आंबेडकर,शासनाच्या प्रशासनात एकेकाळी बुलढाणा जिल्हा भूमीपुत्र म्हणून प्रेरणादायी लक्षवेधी कामगिरी केलेले.मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान सिद्धार्थ खरात,डॉ.राजेश गवांदे (आय.एफ.एस) प्रोटॉकॉल मंत्रालय मुंबई,तसेच बुलढाणा जिल्हा आंबेडकरी चळवळीचे भूषण मान.भिमराव तायडे, रामकृष्ण रजाने,आदि मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले होते.त्यांचे वृद्धापणाने चालता येत नसल्यामुळे त्यांचा जीवन गौरव पुरस्कार पत्रकार कामगार नेते सागर तायडे यांनी स्वीकारण्याची विनंती डॉ.दयानंद इंगळे सर यांनी केली होती.तेव्हा तो सागर तायडे यांनी तो स्वीकारला होता. आणि त्यांना त्यांच्या घरी नेऊन देण्याची जबाबदारी दिली होती.

 बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) म्हणजे वसंत लक्ष्मण गवई हे मुक्काम पोस्ट जानेफळ,तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील रहिवाशी होते. पुढे तहसीलदार,उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रशासकीय सेवा करून ते शेवटी मुंबई येथे सेवानिवृत झाले. पिढ्यानपिढ्या सत्ता संपतीच्या उपभोगास वंचित राहिलेल्या मागासवर्गीय शोषित पिढीत उपेक्षित समाजाचा उत्कर्ष होण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी समता,न्याय,व स्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला पाहिजे.असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन माननीय व्ही.एल.गवई जगले.सेवानिवृती नंतर वयाच्या ८३ व्या वाढदिवसा निमित्याने त्यांचे स्वकथन “पाषणातील झरा” प्रसिद्ध झाले.ते आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणादायी आहे.

सामाजिक बांधिलकी ठेऊन संघटित असंघटित कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रबोधनाच्या कार्यक्रमात असल्यामुळे बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) साहेब यांचे जीवन गौरव सन्मान चिन्ह त्यांच्या घरी नेऊन देण्यास वेळ मिळाला नाही. शुक्रवारी कामगार भवन बांद्रा येथे कार्यालयात कामानिमित्त गेलो होतो तेव्हा कला नगर बांद्रा येथे बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र व्ही.एल.गवई (आय.ए.एस) यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा जीवन गौरव सन्मान चिन्ह दिले.आणि एका जबाबदारीतून मुक्त झालो.तेव्हा त्यांनी प्रशासकीय सेवेतील कामाचा अनुभव व आंबेडकरी चळवळीतील योगदानाची माहिती दिली. त्यांचे स्वकथन पाषणातील झरा हे भेट म्हणून दिले.माझ्या बुलढाणा जिल्हयातील लोकांनी हा जीवन गौरव पुरस्कार मला दिल त्यांचा मला खूप अभिमान वाटला आणि आनंद झाला तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो.असे ते म्हणाले. परंतु मी माझी एक भूमिपुत्र म्हणून जबाबदारी पार पडली आणि आपल्या सारखे अनुभवी आय.ए.एस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले त्याचा मला आनंद वाटला.

सागर रामभाऊ तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *