
विशेष प्रतिनिधी – शिक्षण क्षेत्रात व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्य करणारे प्रा. देविदास पंडागळे यांची शिक्षक भारतीतर्फे दिल्या जाणाऱ्या “सावित्री–फातिमा २०२६” या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षक भारती दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सावित्रीबाई फुले–फातिमा शेख पुरस्काराने गौरव करते. मुंबईतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या हक्क व सन्मानासाठी प्रा.देविदास पंडागळे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, रिद्धी नाट्यमंदिर, प्रभादेवी (न्यू मिनी थिएटर/करिश्मा थिएटर) येथे आयोजित शिक्षक स्नेह संमेलन कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून प्रा.देविदास पंडागळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी हा सन्मान शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची नम्र भावना व्यक्त केली आहे.
सागर तायडे यांस कडून
