विद्रोही कवी,लेखक र.वि.माळापुडेकर यांना साहित्यिक भंन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

बातमी शेअर करा.

मुंबई : कळवा (ठाणे) येथील विद्रोही कवी,लेखक र.वि.माळापुडेकर यांना हुपरी (जि.कोल्हापूर) येथील युवा बौद्ध धम्म परिषदेचा साहित्यिक भंन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.पुरस्कार वितरण 18 जानेवारी 2026 ला हुपरी येथे आहे.
     बौद्धाचार्य र.वि.माळापुडेकर हे भीमनगर (माळापुडे,ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील मूळचे रहिवाशी असून सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत.गेली वीस वर्षे धम्म चळवळीत बुद्ध,शिव,शाहू,फुले,आंबेडकरी विचारधारेतून विद्रोही कविता,कथा,स्तंभ लेखनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व धम्म प्रचार प्रसार कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या लेखनामुळे समाज प्रबोधन व धम्म प्रचार प्रसारास मोलाचे योगदान मिळत आहे.साहित्य सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय व भरीव योगदानाबद्दल युवा बौध्द धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्यावतीने त्यांना साहित्यिक भंन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.या निवडीबद्दल मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण १८ जानेवारीला हुपरी (ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *