
विशेष प्रतिनिधी भांडुप – राजमाता जिजाबाई शहाजी भोसले १२ जानेवारी १५९८ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.त्यांना राजमाता,राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.
भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत.जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.म्हणूनच जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी म्हण प्रसिद्ध आहे.हा आदर्श प्रत्येक महिलानी डोळ्यासमोर ठेऊन मुलावर संस्कार केले पाहिजेत. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील. त्याकरिता महिलांनी राजमाता जिजाऊ यांची जयंतीदिन.स्मृती दिन साजरा केला पाहिजे.असा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भांडुप धम्म उपासिका संघ सर्व महापुरुष,महामाता,संताचा जयंती स्मृती दिन साजरा करीत असतात.यात धम्म उपासिका सुनिता उदेभान तायडे, तुळजाबाई गोविंद इंगळे,ज्योती दिलीप थाटे,कोकिळा महादेव बांगर,चंद्रकला सागर तायडे,सुषमा संजय वाकोडे ह्या विविध प्रेरणादायी लक्षवेधी पोस्टर तयार करून जयंती साजरी करत असतात.
सागर तायडे यांस कडून

