
विशेष प्रतिनिधी बदलापूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची स्थापना होण्यासाठी झालेल्या लढाई अश्वाचा घोड्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.ते घोडे बदलण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे गांव म्हणजेच बदलापूर. आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बदलापूर येथे दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी गौरी मंगल कार्यालय मांजर्ली बदलापूर पश्चिम जिल्हा ठाणे येथे भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याला प्रसिद्ध पूज्य भिख्खू संघ आणि ठाणे जिल्हा व मुंबईतील धम्म उपासक उपासिका यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.पूज्य भंते संघपाल (श्रमण शिक्षा अभियान) अध्यक्ष संघपाल धम्म लाईफ बुद्धिस्ट फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने बदलापूर येथे संपन्न झालेली भव्य धम्म परिषद विविध संस्था संघटना यांच्या पुढाकाराने शंभर टक्के यशस्वी झाली.त्यात विशेष पूज्य भंते करुणानंद महाथेरो, (दि ग्रेड हॅपिनेस यू ट्यूब चॅनल) धम्म परिषद अध्यक्ष,उद्घाटक पूज्य भंते डॉ.एन आनंद महास्थवीर,विशेष उपस्थिती पूज्य भंते विनाचार्य महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, पूज्य भंते चांदीमा थेरो,पूज्य भंते यश थेरो श्रीलंका,पूज्य भंते ज्ञानरक्षित थेरो, पूज्य भंते गुणानंद अभिभू, पूज्य भंते धम्मानंद, पूज्य भिख्खुणी अभिन्ना, पूज्य भिख्खुणी सुनंदा बोधी, पूज्य भिख्खुणी बुद्ध कन्या आणि आदरणीय डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे व अनेक मान्यवरांच्या उपस्थित पूज्य भंते संघकीर्ती महास्थवीर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चे प्रमुख पूज्य भंते विनाचार्य यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रामलीला मैदान दिल्ली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. महाबोधी महाविहार हमारा स्वाभिमान आहे.ते मुक्त झाल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.भारतीय बौद्ध महासभा आणि अखिल भारतीय भिख्खू संघ एकत्र आला तर देशभरातील धम्म उपासक उपासीका महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या शिवाय राहणार नाही.असे आदरणीय डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी सांगितले.आदर्श समाज रचना करण्यासाठी श्रमण शिक्षा अभियानाची आवश्यकता लक्षात घेऊन भव्य धम्म परिषेद बदलापूर चे आयोजन करण्यात आले होते. असे श्रमण शिक्षा अभियान प्रमुख पूज्य भंते संघपाल मुख्य आयोजक यांनी सांगितले. संघपाल धम्म लाईफ बुद्धिस्ट फाउंडेशन आयोजित भव्य धम्म परिषेद बदलापूर मध्ये अखिल भारतीय भिख्खू संघ,भारतीय बौद्ध महासभा,बौद्धजन पंचायत समिती, त्यागमूर्ती फाउंडेशन,समता सैनिक दल,बहुजन विकास समिती,प्रबुद्ध सामाजिक सेवा संस्था,बारवी विपश्यना संस्था,धम्म साकच्छा समूह मुंबई,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,श्रद्धावान उपासक उपासीका संघ बदलापूर युथ रेजिमेंट यांचे विशेष सहयोग लाभले. त्यामुळेच भव्य धम्म परिषद संपन्न झाली.

पूज्य भंते संघपाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयु.राहुल गायकवाड बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा शाखा लुंबिनी बुद्ध विहार बॅरेज रोड बदलापूर यांच्या नेतृत्वाखाली,आयु.सुरेश नाना शिशुपाल ज्येष्ट सामाजिक मार्गदर्शक,आयु.आनंद सोनकांबळे सरचिटणीस बहुजन विकास समिती बदलापूर,आयु.जगजीवन बौद्ध भारतीय बौद्ध महासभा उतर प्रदेश प्रभारी,आयु.विद्याताई कांबळे हेंद्रपाडा- श्रावस्ती बुद्ध विहार, आयु.चंद्रहास तांबे- पाली भाषा बौद्ध साहित्य अभ्यासक,आयु.सुनील दुपटे सामाजिक कार्यकर्ते,आयु.राकेश यादव गुरुजी भारतीय बौद्ध महासभा शाखा लुंबिनी बुद्ध विहार बॅरेज रोड बदलापूर यांनी विशेष मेहनत घेतली.धम्म परिषेदेत बदलापूर शहराच्या आजूबाजूच्या नगरातील व गांवातील धम्म उपासक उपासीका बंधु भगिनीनी मोठ्या उत्सपूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे बदलापूरची भव्य धम्म परिषद यशस्वी झाली.
सागर तायडे यांस कडून बदलापूर

