जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम ए पाटील यांचे हृदयविकाराने निधन.

बातमी शेअर करा.

विशेष प्रतिनिधी ठाणे- असंघटित कष्टकरी कामगार मंजुरांचे लढाऊ झुंझार अभ्यासु जेष्ठ कामगार नेते-कॉम्रेड एम ए पाटील यांचे दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता हृदयविकाराने निधन झाले आहे.त्यांनी सर्व श्रमिक कामगारांच्या समस्या जाणून त्यावर सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष केला.बांधकाम खात्यातील कामगार असो की अंगणवाडी महिला,आशा व गटप्रवर्तक महिला यांच्या अनेक समस्या त्यांनी दीर्घकालीन आंदोलन न्यायालयीन लढाई लढून मिळवून दिल्या. त्यांनी सर्व क्षेत्रातील श्रमिका च्या संघटनांना एकत्र करून कृती समित्या बनविण्यात महत्वाची भूमिका पारपाडली.

  कॉम्रेड एम ए पाटील यांनी अनेक उद्योगाधंद्यातील संघटित असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी तीव्र ऐतिहासिक आंदोलने करून महत्त्वाचे योगदान दिलेली आहे. 

कॉम्रेड एम ए पाटील म्हणजे देशाच्या कामगार चळवळीमधील एक अत्यंत संयमी,नम्र तरीसुद्धा चिवटपणे लढा देणारे अभ्यासू लढावू नेते होते.कॉ.एम ए पाटील यांना महाराष्ट्र राज्यातील आशा,गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना सत्यशोधक कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटन स्वतंत्र कृती समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *