
वास्तविक पाहता राजकारण हे बौद्ध बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु आंबेडकरी चळवळीतील काही तथाकथित अशा आपमतलबी वृती असलेल्या आणि प्रस्थापित पक्षांची भाडोत्री कामे करण्यात जास्त इंटरेस्ट असणाऱ्या त्या काही बौद्ध समाजातील नेत्यांनी स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याला दीखाऊ आणि विकाऊ स्वरूपात आत्मसात करून सामान्य जनांना भुरळ घातली आणि त्यांनी म्हणजे विकाऊ नेत्यांनी व भुरळ पडलेल्या त्यांच्या सोबतच्या विकाऊ बौद्ध मतदारांनी मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या संघर्षातून मिळउन दिलेल्या त्या महान अशा राजकीय मताधिकाराला वेश्यावृत्ति सारखे स्वरूप आणले आणी पाहता पाहता साऱ्या राजकारणाचा बाजार मांडला त्यामुळे राजकारण हे त्यांच्या जगण्या मरण्यातला प्रश्नच कधी झाला नाही. तर उलट तो अधिकार निवडणूक आली म्हणजे यांची चार-दोन दिवस दिवाळी साजरी करण्यासाठीच की काय तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला मताधिकारासाठीचा संघर्ष हा एक प्रकारचे कफल्लक व नीच मानसिकता असलेल्यांचे कुरण बनले हे प्रस्थापितांचे शेणकुट खाणारी नेते मंडळी असेच जगत आले व असेच जगत आहेत.त्या प्रस्थापित पक्षांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्यांनी हा मताचा अमूल्य मताधिकार म्हणजे जनु मतोत्सोव करून ठेवला.जणू काही त्या मताधिकाराला कवडीचीही किंमतच नाही!
काही काही तर स्वतःला आंबेडकरवादी मानवणारे बौद्ध स्त्री-पुरुष हे आंबेडकरी विचारधारेचे फारच जोराने गुणगान करताना म्हणतात की, आज आम्ही ज्या पदावर विराजमान होत आहो.आणि आमचे जे काही हे राजवैभव आहे ती सगळी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची अनमोल कमाई आणि महान पुण्याई आहे.परंतु खरे पाहता हे लोकं आपल्या बापाचे उपकार मान्य करीत असतानाही जर ते निर्लज्जपणे आपल्या बापाने दाखविलेल्याच वैचारिक मार्गाने न जाता जर स्वार्थापोटी भलतीकडेच भटकत असतील तर स्पष्ट सांगायचे झाल्यास ज्या ब्राह्मण्यग्रस्त व्यवस्थेशी हजार वर्षापासून आपल्या बौद्ध संस्कृतीचा सततचा संघर्ष चालत आलेला आहे आणि आजही चालू असताना जर त्याच व्यवस्थेसमोर शस्त्र टाकून सपशेल जर कोणी त्यांना शरण जात असतील तर अशा गोळवळकर,हेगडेवार आणि सावरकरांच्या शेणाखाली जगणाऱ्या तुच्छ किड्यांना मग विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार तरी काय आहे?.काही तर असे निच नराधम आजकाल आमच्या समाजात निर्माण झालेले आहेत की, जो मताधिकार आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमची इज्जत शाबूत राखण्यासाठी व स्वाभिमानाने जगाता यावे म्हणून मिळवून दिला आहे ना! हे महाभाग तोच स्वाभिमान गहाण ठेवून व तीच स्वतःच्या घराची अब्रू इतर पक्षांच्या पुढाऱ्यांजवळ स्वतःच नागडी करण्यासाठी घेऊन जात असतील तर यापेक्षा निर्रलज्जतेचा कळस तरी दुसरा कोणता म्हणायचा?
इथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या राजकीय मताधिकाराला अनुसरून असे महान वक्तव्य केले आहे की, “आपल्यातील प्रत्येक इसम राजकारणाकडे नजर ठेवून राजकीय सत्तेचा उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही”ही महत्वपूर्ण गोष्ट बाबासाहेब आपणास सांगत असतानाच त्याच संदर्भाने त्यांनी अतिशय काळजी करण्याच्या दृष्टीने सुद्धा आणखी एक महत्वाची गोष्ट करण्यास आम्हाला बजाऊन सांगितले आहे की, “एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की, तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील. तुमचे हीत व ज्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटा फूट करतील व दिशाभूल करतील ते तुम्हास दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत, तरी या नामधारी पुढाऱ्यांपासून तुम्ही दूर राहा”एवढ्या प्रखरतेने व स्पष्ट आणि परखड मार्गदर्शन आम्हाला बाबासाहेबांनी केलेले असूनही आमच्या काही हलकट लोकांचे व त्यांच्या हलकट नेत्यांचे भिकारपण स्वीकारून जगणे आणि वागणे सुटता सुटत नाही. ही आमच्या काही लोकांची फार मोठी शोकांतिका आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाला एका ठिकाणी असे सांगतात की, राऊंड टेबल कॉन्फरन्स च्या दुसऱ्या अधिवेशनात ज्यावेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यावेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द म.गांधींनी देखील त्या मागण्यास कसून विरोध केला होता आणि अस्पृश्यांस संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना. तेव्हा बाबासाहेब म्हणतात पद् दलीतांसारख्या सर्व बाजूने नाडलेल्या, आर्थिक दृष्ट्या पंगू झालेल्या, मानसिक दृष्ट्या कमकुवत बनलेल्या, सामाजिक दृष्ट्या कस्पटासमान लेखल्या गेलेल्या, राजकीय दृष्ट्या निर्माल्यवत बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात म्हणजे ज्या राज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश वाटा हिंदूंच्या हातात जाणार त्या राज्यात त्या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार? ही मला मोठी शंका उत्पन्न झाली. तेव्हा पुढे बाबासाहेब असे सांगतात की, मी सर्वास स्पष्ट बजावले की, जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गास जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील, तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज आपली संमती कदापि देणार नाही. एवढ्या ठामपणे जे काम ज्या निर्धाराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले ते काम आज आमचे दुसऱ्याच्या भरवशावर राजकीय संसार उभा करणारे हजारो हलकट नेते करू शकतात काय?
या प्रश्नाचे उत्तर काही केल्या नकारार्थीच येत असेल तर निदान जे झाले ते विसरून जाऊन आता तरी राजकारण हे बौद्ध समाजाच्या व त्यांच्या तमाम नेत्यांच्या जगण्या मारण्याचा प्रश्न झाला पाहिजे! नाही का? या प्रश्नाचे उत्तर तमाम स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने द्यावे! कारण की त्यामुळे तरी या जनतेच्या रेट्या पुढे या निर्लज्जपणा स्वीकारलेल्या नेत्यांना थोडी लाज लज्जा उत्पन्न होईल! ही अपेक्षा!!

जय भीम जय भारत
जीवन बोदडे 9689268620,भांबेरी,जिल्हा अकोला
